ताज्या घडामोडी

जिल्हा अधिकारी श्री रघुनाथ गावडे यांनी ईव्हीएम सिलिंग ची केली पाहणी

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

पाथरी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया साठी निवडणूक विभाग प्रत्यक्ष ईव्हीएम वर मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी तयारी करीत आहे पाथरी येथील ईव्हीएम मशीनवर उमेदवारांच्या निवडणूक निशाणी संगणकाद्वारे स्कॅनिंग करणे व मशीन ची सिलिंग करण्याची प्रक्रिया पाथरी येथील शासकीय औद्योगिक शिक्षण व प्रशिक्षण संस्था येथे सुरू आहे दुपार सत्रात श्री रघुनाथ गावडे निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी परभणी यांनी भेट देऊन बॅलेट पेपर ,बॅलेट युनिट सिलिंग व VVPAT वर उमेदवारांच्या निवडणूक निशाणी स्कॅनिंगच्या कामाची पाहणी केली. बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट सेलिंग चे काम महत्त्वपूर्ण असल्याने कर्मचाऱ्यांनी व्यवस्थितरित्या काळजीपूर्वक काम करण्याच्या सूचना केल्या यावेळी त्यांनी ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम नंबर एक व दोन ची पाहणी केली तसेच 5 टक्के ईव्हीएम वर प्रात्यक्षिक नोंदवलेल्या जाणाऱ्या मतदान प्रक्रियाची भेट देऊन पाहणी केली. नंतर त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवनांद्रा साखर कारखाना परिसर येथे भेट देऊन मतदान कामावर नियुक्त मतदान अधिकारी, पोलीस कर्मचारी यांच्यासाठी विशेष टपाली मतपत्रिकेवर मतदान करण्यासाठी उभारण्यात आलेल्या मतदान केंद्राची पाहणी केली यावेळी त्यांच्यासोबत उपजिल्हा अधिकारी निवडणूक श्री जनार्दन विभुते उपस्थित होते मान्यवरांचे स्वागत श्री शैलेश लाहोटी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पाथरी यांनी केले त्यांना सहाय्यक म्हणून श्री पांडुरंग माचेवाड तहसीलदार मानवत , श्री शंकर हांदेश्वार तहसीलदार पाथरी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी हे काम पाहत असून तुकाराम कदम मुख्याधिकारी नगर परिषद पाथरी, वसंत महाजन नायब तहसीलदार निवडणूक पाथरी इतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close