ताज्या घडामोडी

न.प. ने मोकाट व रोगबाधित कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा – नुमान चाऊस

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

माजलगाव शहरात रोग बाधित कुत्र्यांचा सुळसुळाट खुप वाढला आहे. त्यांना खाज सह अन्य वाईट रोगांची लक्षणे त्यांमध्ये स्पष्टपणे दिसत आहेत. जागोजागी हे रोग बाधित कुत्रे आढळून येतील. त्यांच्यापासून नागरिकांच्या स्वास्थ्याला गंभीर धोका आहे. लहान मुलं बाळांना तर जास्त धोका आहे. असले रोग बाधित कुत्रे कोणाला चावणे, घाण करणे, रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांना तोंड लावणे याद्वारे अनेक रोग हे नागरिकांत व विशेषतः मुलं बाळांत पसरवू शकतात. ही बाब अत्यंत धोकादायक व गंभीर आहे. मेन रोड, नगरपरिषद परिसर, पाटिल गल्ली, भीम नगर, फुले नगर सह अनेक जागांवर मोकाट जनावरे व कुत्रे रस्ता अडवून बसलेले असतात.

रस्त्यांतून जाणाऱ्या नागरिकांना धडक मारणे असे प्रकार होत आहेत. जवानांसह वृद्धांना व लहान मुलं बाळांना पण जीवास व स्वास्थ्यास खूप मोठा धोका निर्माण झाला आहे. हा प्रकार गेल्या अनेक महिन्यांपासून चालू आहे. तरी आजपर्यंत नगरपालिकेने व प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही. अनेक नागरिकांना कुत्र्यांनी चावा देखील घेतलेला आहे. नगरपालिका व प्रशासनाला मागणी करण्यात येते की लवकरात लवकर या रोग बाधित कुत्र्यांचा व मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी मौलाना आझाद युवा मंच चे जिल्हाध्यक्ष नुमान अली चाऊस यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close