ताज्या घडामोडी

नागपूर येथे २८ मे ला “आपलं तेली समाज संघ” राज्यस्तरीय भव्य वधू-वर परिचय मेळावा

प्रतिनिधी:रामचंद्र कामडी

संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांचे आशीर्वादाने आपलं तेली समाज संघ, महाराष्ट्र राज्याचा पहिला वधू-वर परिचय मेळावा दि. 28 मे 2023 रोजी, जवाहर विद्यार्थी गृह, सिव्हिल लाईन, नागपूर येथे सकाळी 10 ते ४ या वेळात अतिशय थाटात संपन्न होत आहे. मेळाव्याला समाजातील विविध क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कामगिरी करणारे पदाधिकारी , सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे समाज बांधव-भगिनीं व अनेक मान्यवर मंडळींची उपस्थिती लाभणार असल्याचे आयोजकांनी एका प्रसिद्धी पत्रकातून कळविले आहेत. महाराष्ट्र राज्याच्या सन 2023-24 या वर्षाच्या अर्थसंकल्पात धार्मिक क्षेत्रांच्या विकासा अंतर्गत श्री संताजी जगनाडे महाराज आर्ट गॅलरी, नागपूर करिता 6 कोटी रुपये या शिवाय श्री संताजी जगनाडे महाराज समाधीस्थळ, सुदुंबरे (पुणे) करिता 25 कोटी रुपये या प्रमाणे तेली समाजाच्या उद्धारासाठी केलेल्या भरीव आर्थिक सहकार्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा या कार्यक्रमा निमित्ताने सत्कार करण्यात येणार असल्याचे या संघाचे संस्थापक अध्यक्ष गुणवंत वाडीभस्मे – मुंबई यांनी सांगितले.

आयोजित नागपूर विभागीय राज्यस्तरीय नियोजित मेळाव्याचे साक्षीदार होण्यासाठी सर्व शाखीय तेली समाज बांधव-भगिनींनी आप-आपसातील मतभेद विसरून तेली समाजाच्या हितासाठी असलेल्या एकाच बँनरखाली एकत्रित येण्याचे आवाहन आयोजकांकडुन करण्यात आले आहे.या निमित्ताने नागपूर येथील वधू-वर परिचय मेळाव्यासाठी ” माझा परिचय नोंदणी ” दिनांक 28 मे 2023 रोजी सकाळी 7 वाजता पर्यंत ऑनलाईन पद्धतीने सुरु राहणार आहे. विवाहोत्सुक मुला-मुलींना दि. 28 मे 2023 रोजी मेळावा कार्यक्रमात व्यासपीठावर येवून आपला परिचय देण्याची संधी दिल्या जाईल .
मेळाव्याला समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संघाचे संस्थापक व अध्यक्ष गुणवंत वाडीभस्मे यांनी केले आहे.अधिक माहिती साठी त्यांचा संपर्क क्रमांक 7506032550 असा आहे .
सदरहु कार्यक्रमाचे नियोजन नागपूर विभागीय अध्यक्ष विलास बुटले, नागपूर विभागीय उपाध्यक्ष अशोक खंते, नागपूर जिल्हा अध्यक्ष अजय हिंगे, नागपूर जिल्हा महिला अध्यक्षा मंजुषाताई लोहबरे, नागपूर जिल्हा महिला उपाध्यक्षा वीणाताई खंते, यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे . या मेळाव्यास चंद्रपूर जिल्ह्यातून चंद्रपूर जिल्हा महिला अध्यक्षा छबूताई वैरागडे, नंदाताई गिरीपुंजे नागभीड तालुका अध्यक्षा, भारत गौरकर चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष,रामकुमार झाडे ब्रम्हपुरी तालुका अध्यक्ष, विनायक चिलबुले नागभीड तालुका अध्यक्ष, गणेश बेले राजुरा तालुका अध्यक्ष, गिरीश कामडी कोपरना तालुका अध्यक्ष ,छत्रपती देवतारे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष, तुषार बुटले चंद्रपूर जिल्हा संघटक आदीं सर्व पदाधिकारी त्यांच्या सहकारी पदाधिकाऱ्यांसह उपस्थित राहणार आहे.
विदर्भातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर ,गोंदिया ,वर्धा , गडचिरोली ,अमरावती, अकोला , यवतमाळ ,बुलढाणा व वाशीम जिल्ह्यातील देखिल पदाधिकारी बांधव उपस्थित राहणार आहेत.हा मेळावा ” न भूतो, न भविष्यती ” असाच राहणार असल्याचे समाजबांधवात बोलल्या जात आहे .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close