वरोरा उपजिल्हा रुग्णालयात जागतिक आरोग्य दिन साजरा
उपसंपादक :विशाल इन्दोरकर
दिनांक ७ एप्रिल २०२२ ला उपजिल्हा रुग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे जागतिक आरोग्य दिवसाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
डाॅ मा . प्रफुल्ल खूजे जनरल सर्जन , सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका उपजिल्हा रुग्णालय वरोरा, सौ कोडापै ,सौ कुमरे , श्री राजपूत सर ईसीजी टेक्नीशियन या सर्वांनी दिपप्रज्वलन करून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता दैवत यांची पूजा करून कार्यक्रमाची सुरुवात केली. सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका उपजिल्हा रुग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर यांनी आपल्या प्रास्ताविकात संपूर्ण आरोग्य कसे ठेवायचे याविषयी सविस्तर माहिती दिली. डाॅ खूजे यांनी अध्यक्षीय भाषणात बदलती जीवनशैली आणि आरोग्य विषयावर मार्गदर्शन केले.
सुत्रसंचालन सौ रबिना खान व आभारप्रदर्शन सौ वर्षा भूसे यांनी केले. श्रि जवादे सौ भुसे , यांनी आरोग्य विषयावर आपले मत मांडले. सोबत रांगोळी स्पर्धा , स्लोगन स्पर्धा आयोजित केली होती. भरपुर प्रतीसाद मिळाला. या मार्फत जनजागृती करण्यात आली. रांगोळी स्पर्धा मध्ये आॅपरेशन थेटर मधून सौ रूबिना खान , अंकिता लोखंडे,शितल राठोड ,आयपिडि डिपार्टमेंट मधून सो वैशाली,सौ मीना मोगरे, सुजाता, रोशनी व सपना इत्यादी उपस्थित होते.
संत गाडगेबाबा यांना ग्रामस्वच्छता अभियानाचे प्रेरक मानून पूजन करून ‘ईतनी शक्ति हमे देना दाता’ या प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.