महिला पतंजली योग समितीचा येत्या रविवारी चंद्रपूरात जागतिक महिला दिनाचा भव्य कार्यक्रम
शोभा भागिया, स्मिता रेभनकर, सपना मुनगंटीवार व प्रेरणा कोलतेंची राहणार उपस्थिती
कार्यक्रमाला मोठ्या संख्येंने उपस्थित राहण्याचे अपर्णा चिडे यांचे आवाहन
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
शहरातील पठाणपूरा मुख्य मार्गावर असणाऱ्या गांधी चौकातील जैन भवनात उद्या रविवार दि.१७ मार्चला सकाळी १०:३०ते दुपारी ३वाजे पर्यंत जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम थाटात व उत्साहात साजरा होतोय आहे.या कार्यक्रमाचे आयोजन महिला पतंजली योग समिती महाराष्ट्र पूर्व चंद्रपूर यांनी केले आहे.सदरहु कार्यक्रमाला प्रामुख्याने राज्य प्रभारी महाराष्ट्र पूर्वच्या शोभा भागिया,राज्य कार्यकारिणीच्या सदस्य स्मिता रेभनकर , जिल्हा प्रभारी नसरीन शेख या शिवाय सपना मुनगंटीवार, मंजूश्री कासमगोट्टूवार व प्रेरणा कोलते उपस्थित राहणार असल्याची माहिती महिला पतंजली योग समितीच्या जिल्हा महामंत्री अपर्णा चिडे यांनी आज एका प्रसिध्दीतून दिली आहे.पतंजली योग समितीचे चंद्रपूर जिल्हा पदाधिकारी,तालूका प्रभारी पदाधिकारी, योगशिक्षिका,योग साधिका, वार्डातील जेष्ठ नागरिक, व युवा कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाला मोठ्या संख्येंने उपस्थित राहण्याचे आवाहन अपर्णा चिडे यांनी केले आहे.जागतिक महिला दिना निमित्त आयोजित या भव्य कार्यक्रमात विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या काही महिलांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी या प्रतिनिधीशी बोलताना आज सांगितले.