स्त्री शक्ती महिला आघाडीच्या अध्यक्ष पदी शिल्पा कांबळेंची नियुक्ती तर उपाध्यक्षपदी मिनाक्षी बनाईत यांची निवड!
प्रतिनिधी:रामचंद्र कामडी
स्त्री हीच शक्ती निर्मानाचे प्रचंड मोठे केंद्र आहे .तिने स्वतःला जगापुढे सिद्ध करण्यापेक्षा स्वतःची स्पर्धा करीत राहून स्वयमसिद्धा बनले पाहिजे. जगाने आपल्या पद्धतीने बदलावे अशी अपेक्षा करण्यापेक्षा स्वतःमध्ये बदल घडविणे जास्त सोपे! स्वतःशी तादात्म्य पावणयाचा मार्ग स्वीकारणे हीच खरी साधना होय. प्रत्येक स्त्रीकडे धाडस बुद्धी कौशल्य चातुर्य आणि कष्टाळू वृत्ती आहे तरी तिला दुय्यम स्थान मिळते याला कारण भारतीय संस्कृती ही पुरुषप्रधान आहे. स्त्री ही विश्वाची जननी तरीसुद्धा हीच संस्कृती स्त्रीत्वाचा सन्मान करण्यास मात्र विसरली आहे.
स्त्री शक्ती ऐक तुझी कहाणी ,
तू कुणाची माता तर कुणाची भगिनी.
तुझा गौरव तुझ्या कर्तृत्वावर आहे .
तुझे कष्ट तुझ्या यातला तरी तू ताट उभी आहे.
चंद्रपूरात नव्यानेच स्री शक्ती महिला आघाडीची स्थापना करण्यात आली असून या आघाडीच्या अध्यक्ष पदी सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणाऱ्या शहरातील सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा सुहास कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर याच आघाडीच्या उपाध्यक्षपदी मिनाक्षी अनिल बनाईत यांची निवड करण्यात आली आहे.या शिवाय या संघटनेचे सचिव पद सुवर्णा रामदास रत्ने यांचे कडे सोपविण्यात आले आहे तर सहसचिव पदाची जबाबदारी फरजाना इरफान शेख यांचे कडे देण्यात आलेली आहे.इत्तर कार्याकारणी सदस्यांत स्वाती अश्विनी पेटकर , मिनाक्षी प्रदीप सावरकर,वर्षाताई गोंडाणे ,सुरेखा रामगोपाल खोब्रागडे,किरण कोंडावार व रुक्मीणी प्रविण सावरकर यांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला असल्याचे नवनियुक्त अध्यक्ष शिल्पा कांबळे यांनी या प्रतिनिधीस सांगितले.दरम्यान चंद्रपूरात नुकत्याच पार पडलेल्या एका नृत्य स्पर्धेत यातील काही सदस्यांनी भाग घेतला होता .