महाराष्ट्र राज्य प्राथमिक व उच्च प्राथमिक मुख्याध्यापक सेवा मंडळाच्या राज्याध्यक्षपदी अशोक वैध यांची निवड
तालुका प्रतिनिधी:मंगेश शेंडे चिमुर
दिनांक 23 जानेवारी 2022 रोजी महाराष्ट्र राज्य, प्राथमिक व उच्च प्राथमिक मुख्याध्यापक सेवा मंडळाच्या बैठक राज्य नेते अरुण आवारी यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. सदर बैठकीमध्ये राज्याची नविन कार्यकारिणी सर्वानुमते निवडण्यात आली. राज्याध्यक्ष पदी-चंद्रपूर येथील ब्रम्हपुरी पंचायत समिती अंतर्गत कार्यरत जि प उच्च प्राथमिक शाळा,बेटाला शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक अशोक वैद्य यांची राज्याध्यक्ष पदी एकमताने निवड करण्यात आली.
एक उत्तम संघटक,उत्तम वक्ता,शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असलेले व्यक्तीमत्व, चंद्रपूर जिल्ह्यातील उच्च श्रेणी मुख्याध्यापकांच्या विविध समस्यांची जाण ठेऊन कार्य करणारे कार्यकता,वेळप्रसंगी समस्या सोडविण्यासाठी आपल्या अभ्यासूवृत्तीने अधिकाऱ्यांना बाध्य करणारे व्यक्तिमत्त्व या सर्व बाबींची दखल घेऊन राज्यनेतृत्वाने चंद्रपूर जिल्ह्याला मानाचे पद अशोक वैध यांचे रुपात दिले आहे.यापूर्वीही अशोक वैध यानी संघटनेच्या अनेक पदावर कार्य करून शिक्षकांच्या अनेक समस्यांना वाचा फोडून न्याय प्रदान केलेला आहे.या सर्व कामाची दखल घेऊन त्यांची राज्याध्यक्षपदी निवड करून त्यांच्या केलेल्या कार्याची एकप्रकारे पावती प्रदान केलेली आहे.
या निवडीबद्दल त्यांचे अनेक स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.त्यांच्या निवडीबद्दल जिल्हाध्यक्ष कालिदास येरगुडे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती चंद्रपूर, उमाजी कोडापे, सरचिटणीस,,सुधाकर पोपटे, जिल्हाकार्याध्यक्ष, राम बोबडे,जिल्हाउपाध्यक्ष, किशोर गभने,प्रविण बुचे, शेख सर कमलाकर पाटील, नेमाजी आस्वले, गुलाब पाल, संतोष बोडखे, रमा दहेगावकर, सीमा वांदिले तसेच सर्व तालुका कार्यकारिणीने समाधान व्यक्त करून त्यांचे स्वागत करून अभिनंदन केले आहे.