मंडळ अधिकारी निरंजन गोरेंची उल्लेखनीय कामगिरी
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
एकिकडे चंद्रपूर जिल्ह्यात रात्रीला अवैध गौण खनिज चोरुन नेण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असतांना काही प्रामाणिक अधिकारी व कर्मचारी प्राणाची पर्वा न करता गुप्त माहितीच्या आधारे अवैध रेती तस्करांच्या मुसक्या आवळत आहे.अश्यातच शासकीय कामाचा व्याप सांभाळत चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील राजूराचे कर्तव्यदक्ष मंडळ अधिकारी निरंजन गोरे यांनी आता पर्यंत गुप्त माहितीच्या आधारे या तालुक्यातील सहा अवैध रेती तस्करांना दणका देत त्यांच्या वर नियमानुसार दंडात्मक कारवाई करत ती प्रकरणे तहसिल कार्यालयाला सादर केली आहे.त्यामुळे शासनाच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणात महसूल जमा झाला आहे.गोरे यांनी या पूर्वी जिवती सारख्या ठिकाणी उत्तमरित्या पटवारी दप्तरचे काम करुन शेतकऱ्यांसोबतच सर्व सामान्य जनता व अधिकारी वर्गांचा विश्वास संपादन केला होता.आजच्या घडीला राजूरा उपविभागात मंडळ अधिकारी म्हणून त्यांचे काम उल्लेखनीय असेच आहे.अनेकांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे.