ताज्या घडामोडी

दिवाळीच्या दिवशी युवा शेतकऱ्याची आत्महत्या

  • उपसंपादक :विशाल इन्दोरकर
  • राजुरा तालूक्यातील धानोरा येथील युवा शेतकरी सुरेश बंडू दोरखंडे याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आज दुपारी तीन वाजता ही घटना उघडकीस आली. आज शेतकऱ्यांच्या जीवनातील महत्वाचा अश्या दिवाळीतील गाईगोदन च्या दिवशी बोन्डअळी व परतीच्या पावसाने पीक उध्वस्त झाल्याने खाजगी कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत आज या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली. सुरेश बंडू दोरखंडे,वय ३६ हा विरुर स्टेशन जवळील धानोरा येथील शेतकरी गेल्या पंधरा दिवसापासून परतीच्या पावसामुळे व नंतर बोन्डअळीच्या प्रादुर्भावामुळे त्याच्या शेतीतील कापूस पिकाच्या झालेल्या नापिकीमुळे चिंतीत होता. दिवाळीतही आपण कुटुंबा साठी काही करु शकलो नाही, याचे त्याला शल्य होते. आज सकाळीच सुरेश घराबाहेर पडला आणि दुपारपर्यंत घरी आला नाही, म्हणून कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. अखेर दुपारी तीन वाजता खांबाडा गावशिवारातील एका शेतातील झाडाला गळफास घेतलेला त्याचा मृतदेह आढळून आला. मृत शेतकऱ्याचे मागे पत्नी,मुलगी व आई आहे. ऐन दिवाळीत झालेल्या या शेतकरी आत्महत्येमुळे गावकरी दुःख व्यक्त करीत आहेत.
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close