त्रिवेणी व्यापारी संघटनेच्या आंदोलनाला आविसचा पाठिंबा
आविस सल्लागार तथा जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी आंदोलन स्थळी भेट देवून पाठिंबा जाहीर केला.
तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी
भामरागड येतिल पर्लकोटा नदीवर नवीन पुलामुळे मुख्यामार्गावरील दुकाने व घरांना विस्थापित व्हावे लागत आहे.
हा पुला भामरागड येतिल मुख्य बाजारपेठेतून जाणार आहे त्यामुळे अनेकांचे घरा व दुकाने पाडली जाणार आहेत,येतिल व्यापारांनी आठ महिन्यापासून शासन-प्रशासनाकडे नवीन बाजारपेठेसाठी हक्काची जागा मिळावे म्हणून अनेकदां निवेदन दिले.मात्र दाखल घेतली नाही.
त्यामुळे सोमवार पासून त्रिवेणी व्यापारी संघटना भामरागड यांच्या वतीने सम्पूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली असुन धरणे आंदोलन करत आहेत.
सदर आंदोलनाला आदिवासी विद्यार्थी संघटनेचे विदर्भ सल्लागार व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी भेट देवून भामरागडचे तहसीलदार,नगरपंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी,यांचाशी चर्चा करून आवाहल शासनाला पाठवण्याच निर्देश दिले.असुन सदर आंदोलनाला आदिवासी विद्यार्थी संघटने कडून पाठिंबा जाहीर केले.
यावेळी अहेरी पंचायत समितीचे सभापती श्री.भास्कर तलांडे,पेरमिलीचे माजी सरपंच श्री.प्रमोद आत्राम,माजी उपसरपंच अशोक येलमूले,श्रीकांत बंडामवार,व आंदोलनकर्ते उपस्थित होते.