ताज्या घडामोडी

बोरगव्हान येथे चंपाशष्टी निमित्त भव्य जंगी कुस्त्यांचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

मौजे बोरगव्हान येथे प्रतिवर्षी प्रमाणे चंपाशष्टी निमित्त भव्य जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते या भव्य जंगी कुस्त्यांचे उद्घाटन माजी शिक्षण व आरोग्य सभापती दादासाहेब टेंगसे साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले.

या कुस्त्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील खेळाडूंना मातीतील खेळांचा रांगडा अनुभव घेता येतो व उत्कृष्ठ खेळाडू या माध्यमातून तयार होतील असे प्रतिपादन दादासाहेब टेंगसे यांनी केले यावेळी नामदेवराव इंगळे(बापू),बालासाहेब इंगळे,बळीरामजी इंगळे,केशवराव इंगळे,भास्करराव इंगळे,संदीपाणजी इंगळे,कृष्णा(देवा) इंगळे,सरपंच केशवराव खुडे,उपसरपंच विठ्ठलराव कदम,सिध्देश्वर इंगळे,परमेश्वरराव इंगळे,माऊली इंगळे व इतर सर्व नवयुवक मित्र मंडळ,गावकरी मंडळी उपस्थित होती.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close