ताज्या घडामोडी
साईबाबा जन्मस्थान मंदिर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त योगेश शास्त्री इनामदार पुजारी यांचे शुभहस्ते श्रीकृष्ण योगेश्वर भगवान यांना श्रद्धापूर्वक यथासांग अभिषेक करण्यात आला.म्रुदुंगाचार्य श्रीसंत सुरेश महाराज अबदल, हभप सौ मधुबाला प्रभाकर पाटील व बाळ गोपाल यांनी साई बाबा जन्मस्थान मंदिरात सुश्राव्य हरीपाठाचा कार्यक्रम केला.
अशी माहीती श्री साई स्मारक समितीचे सचिव तथा कार्यकारी विश्वस्त अॅड. अतुल चौधरी यांनी दिली.