ताज्या घडामोडी

नरळद यात्रेतून एसटीला 12 हजाराचे उत्पन्न

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

नरळद यात्रेनिमित्त दोन दिवस सोडण्यात आलेल्या यात्रा स्पेशल बस गाड्या च्या माध्यमातून एसटीला बारा हजाराचे उत्पन्न मिळाल्याची माहिती आगारप्रमुख ज्ञानेश्वर हाडबे यांनी मंगळवारी सत्कारा वेळी बोलताना दिली.
16 व 17 मे रोजी दोन दिवस संत देवयमाय संस्थान नरलद येथे यात्रा भरली होती. यात्रेनिमित्त भाविकांच्या सोयीसाठी बस गाड्या सोडाव्यात अशी लेखी मागणी केल्यानंतर गंगाखेड आगाराचे आगारप्रमुख ज्ञानेश्वर हाडबे यांनी यात्रा स्पेशल बस सोडण्याची व्यवस्था केली होती. गंगाखेड ते राजुर मार्गावर बस गाड्या धावल्या. याचा नरलद ते राजूर व नरलद ते गंगाखेड या दोन्ही मार्गावरील भाविकांना फायदा झाला. एकूण तीनशे साठ किलोमीटरचा प्रवास करत या बस गाड्यांनी गंगाखेड आगाराला 12136 रुपयाचे उत्पन्न मिळवून दिले. मंगळवारी संत देवीईमाय संस्थानचे मठाधिपती ह-भ-प तुळशीदास महाराज देवकर यांच्या हस्ते व परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आगारातील अधिकारी व यात्रा स्पेशल बस ची संकल्पना मांडणारे नारायणराव धनवटे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी एसटी आगाराचे अधिकारी पौल, मरडसगावं चे माजी सरपंच जयदेव मिसे, माजी सरपंच नारायणराव धनवटे ,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जयवंत कुंडगीर ,जोशी समाज संघटनेचे रामेश्वर भोळे आदींची उपस्थिती होती.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close