ताज्या घडामोडी
आमदार धर्मरावबाबा आत्राम साहेब यांच्या प्रयत्नाने तीन तालुक्यातील रुग्णालय येथे रुग्णवाहिका वितरण
तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी
भारतीय ७६ या प्रजासत्ताक दिनानिमित्त अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम क्षेत्र असलेला अहेरी, एटापल्ली, सिरोंचा भागातील अनेक समस्यांना असलेला आरोग्य व्यवस्थापनात मजबुती देण्यासाठी तसेच अनेक गोरगरिबांना फायदा होण्यासाठी वेळेवर उपचारासाठी रुग्णवाहिकेचा गरज असल्याने आमदार धर्मरावबाबा आत्राम साहेब यांनी त्यांच्या स्थानिक निधीतून अहेरी, एटापल्ली, सिरोंचा, तालुका साठी रुग्णालय यांना रुग्णवाहिका वितरण करण्यात आले. यादरम्यान जिल्हा परिषद माजी अध्यक्षा भाग्यश्री ताई आत्राम यांच्या उपस्थितीमध्ये अहेरी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कन्ना मडावी अहेरी येथील नवनिर्वाचित नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते होते .