ताज्या घडामोडी
लंकापती रावण क्रीडा मंडळ वांगेपल्ली यांच्या वतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन
जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन..!!
तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी
अहेरी तालुक्यातील ग्रा.प.वांगेपल्ली येथे लंकापती रावण क्रीडा मंडळ वांगेपल्ली यांच्या वतीने आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले होते.
सदर क्रिडा स्पर्धेसाठी पहिला,दूसरा व तिसरा असे तीन पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहे.
सदर स्पर्धेचे उदघाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.सौ.पुष्पा आत्राम ग्रा.प.वांगेपल्ली,पुष्पा मडावी ग्रा.प.सदस्य ,सुभाष सड़मेक पोलीस पाटील,श्री.पूल्ला मडावी प्रतिष्ठित नागरिक,जगदीश मिछा पोलीस शिपाई,दिलीप मडावी, वंदना दुर्गे,एस आर मडावी,गिरमाजी सिडाम,पुष्पा आत्राम,गुलाबराव सोयाम माजी सरपंच होते उपस्तीत होते.