जवाहर नवोदय विद्यालय तळोधी येथील वर्ग 10 व बारावीचे वर्ग नियमित सुरू ठेवावे – पालकांची मागणी
ग्रामीण प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी
गेल्या दीड ते दोन वर्षापासून जगावर कोरोना महामारीचे संकट ओढवले असून यामुळे अभूतपूर्व आणि असामान्य असे परिस्थिती निर्माण झाली. कोरोना महामारी शैक्षणिक प्रक्रियेवर ही अभूतपूर्व परिणाम केला. विषाणूच्या भीती मुळे शाळा कॉलेज बंद करण्यात आले त्यामुळे घरीच बसून ऑनलाइन शिक्षण घेणे अनिवार्य झाले. ऑनलाइन शिक्षण विद्यार्थ्यांना कितपत पचनी पडतोय हा प्रश्न वेगळा, शाळा कॉलेज मध्ये प्रत्यक्ष विद्यार्थी समोर शिकविणे आणि ऑनलाइन विद्यार्थ्यांना शिकविणे यात फरक आहे. अनेक विद्यार्थी ऑनलाईन शिकवणे मध्ये प्रश्न उपस्थित करण्याचे टाळतात शिवाय शिक्षक वर्गात असे मार्गदर्शन करू शकतात तसंच आणि तितक्याच प्रभावीपणे ऑनलाइन क्लासमध्ये शक्य नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. ऑनलाइन शिक्षण साठी लागणारे सर्व साधने शहरी किंवा श्रीमंत अशिक्षित पालकांचे मुलांकडे असतात परंतु गरीब भागातील गरीब कष्टकरी अशिक्षित पालकांच्या मुलांचे काय? काही पालकांकडे ऑनलाईन साधने अजूनही नाहीत त्यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी अस्वस्थता निर्माण झालेली आहे. प्रत्यक्ष शिक्षणातुन विद्यार्थ्याच्या व्यक्तीमत्त्वाचा विकास होत असतो. विविध परीक्षांमुळे विद्यार्थ्यांची बौद्धिक बौद्धिक क्षमता समजून येते क्रीडा स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकास होत असतो. त्याचा आत्मविश्वास वाढीस लागतो शिक्षणाचे व वाचनाची ओढ निर्माण होते. जवाहर नवोदय विद्यालय येथील अनेक विद्यार्थी खेड्यापाड्यातून असल्यामुळे त्यांना ऑनलाईन सुविधा असून सुद्धा कधीकधी किंवा बरेचदा नेट मिळत नसल्यामुळे ते शिक्षणापासून वंचित राहतात किंवा त्यांना ऑनलाइन ची आवड नसल्यामुळे ते ऑनलाईन क्लास काढतात त्यामुळे वर्ग दहावी आणि बारावी ची वर्ग नियमित सुरू ठेवून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे अशी मागणी जवाहर नवोदय विद्यालय तळोधी मध्ये शिकत असलेल्या सर्व पाल्याच्या पालकांनी केलेली आहे.