पाथरी कृषी उत्पन्न बाजार समिती ने शेतकऱ्यांसाठी स्विकारले दायीत्व
![](https://apnews.co.in/wp-content/uploads/2021/07/IMG-20210714-WA0085.jpg)
आमदार बाबाजाणी दुर्राणी यांचे वाढदिवसानिमित्त विशेष उपक्रम.
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीने राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या धान्याचे नुकसान होऊ नये यासाठी योग्यप्रकारे चाळणी होण्याच्या हेतूने निर्माण केलेल्या चाळणी संच चा लोकार्पण सोहळा आमदार बाबाजाणी दुर्राणी यांचे वाढदिवसानिमित्त गुरूवार १५ जुलै रोजी आयोजित केला आहे.
पाथरी कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्डात १५ जुलै रोजी सकाळी १०:१० वा.धान्य चाळणी संचा चा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे.याप्रसंगी उद्घाटक म्हणुन सत्कारमुर्ती आ.बाबाजाणी दुर्राणी यांची उपस्थिती राहणार आहे. तर प्रमुख उपस्थिती म्हणुन जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे ,सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे,सहाय्यक निबंधक माधव यादव यांची उपस्थिती राहणार आहे अशी माहिती बाजार समितीचे सभापती अनिलराव नखाते यांनी दिली आहे.यावेळी त्यांनी सांगितले की, आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवून अनेक विकासात्मक निधी खेचून आणला व स्वनिधीचाही योग्य वापर करत प्रशासकीय ईमारतीसह अनेक विकासात्मक बाबीची पुर्तता केली आहे. याचाच एक भाग म्हणून बाजार समितीने स्वनिधी व कृषी पणन मंडळाच्या सहकार्यान शेतकऱ्यांच्या मालाची उत्तम प्रकारे चाळणी होऊन नुकसान होणार नाही या हेतूने बाजार समितीच्या वतीने ६५ लाख रुपयांचा चाळणी संच कार्यान्वित केला असुन त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे.तर याशिवाय १ हजार मेट्रिक टन क्षमतेचा १ कोटी दहा १० रुपयेच्या गोडाऊन चे बांधकाम पूर्ण होत आहे. यामुळे पाथरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मालाला सुरक्षितता मिळणार आहे.
या कार्यक्रमाचे संयोजन सभापती अनिलराव नखाते, उपसभापती एकनाथराव शिंदे,सचिव बि.जी.लिपने संचालक माधवराव जोगदंड,प्रभाकर शिंदे,बाळासाहेब कोल्हे,सुरेशबप्पा ढगे,लहुराव घांडगे,रूस्तुमराव झुटे,गणेशराव घुंबरे,नारायणराव आढाव,राजेश्वर गलबे,भगीरथ टाकळकर,एकनाथ सत्वधर,दगडुबा दुगाने,विश्वांभर साळवे,बाबासाहेब कुटे,सय्यद गालेब,आश्रोबा शिंदे हे करीत आहेत.
पाथरी तालुक्यातील शेतकरी ,व्यापारी बांधवांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे अवाहन बाजार समीतीच्या वतीने करण्यात आले आहे.