चिमुर मध्ये मोबाईल चोरांना अटक
मुख्य संपादकः कु. समिधा भैसारे
पोलीस स्टेशन चिमूर येथे दिनांक 14/07/2023 रोजी फिर्यादी नामे राजू पांडुरंग नंदनवार यांनी त्यांनी तोंडी रिपोर्ट केली की चिमूर आठवडी बाजारात भाजीपाला खरेदी करीत असताना त्यांच्या शर्टाच्या वरच्या खिशात असलेला वन प्लस कंपनीचा मोबाईल की 15,000/- ₹ कोणीतरी सायंकाळी 06/30 वाजता दरम्यान चोरी केला सदर मोबाईल कव्हर च्या मागे त्यांचे आधार कार्ड असून सदर मोबाईल चोरी केल्याबाबत पोलीस स्टेशन चिमूर येथे तक्रार दाखल केल्याने पोलीस स्टेशन चिमूर येथे अप क्रमांक 232/2023 कलम 379 भादवि अन्वय गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्ह्याच्या तपासात आरोपीचा शोध घेणे करिता तपास पथक रवाना करण्यात आले असता त्यांना हजारे पेट्रोल पंप येथे संशयित चार चाकी वाहन स्विफ्ट डिझायर क्रमांक MH-40-Y-6496 हे दिसून आले सदर वाहनाची झडती घेणे करिता वाहनास थांबविण्याचा प्रयत्न केला असता सदर वाहन चालकाने त्याचे वाहन घेऊन उमरेड रोडनी पळून जात असता पोलीस पथकांनी त्याचा पाठलाग करून सदर वाहनास न्यू राष्ट्रीय शाळेजवळ थांबवून सदर वाहनाची झडती घेतली असता सदर वाहनांमध्ये नमूद गुन्ह्यातील चोरीस गेलेला मोबाईल वन प्लस कंपनीचा मिळून आला तसेच त्या व्यतिरिक्त इतर तीन मोबाईल हँडसेट मिळून आल्याने वाहनामध्ये असलेले आरोपी नामे 1) धर्मेंद्र गणेश दास कुरील वय 55 वर्ष, रा. रविदास नगर येरखडा कामठी जिल्हा नागपूर, 2) बलराम कुमार चंद्रदेव महतो,वय 20 वर्ष, रा. महाराजपुर जिल्हा साहेबगंज झारखंड, हल्ली मुक्काम कळमना वस्ती नागपूर याच्याकडून पोलीस स्टेशन चिमूर येथील अप क्र. 232/2023 कलम 379 भादवी मधील चोरीस गेलेला मोबाईल व इतर तीन मोबाईल तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली चार चाकी स्विफ्ट डिझायर असा एकूण 2,95, 000/_₹ चा माल हस्तगत करण्यात आला, सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव साहेब, तथा पोनी. गभणे साहेब यांचे मार्गदर्शनात पो उपनी सोरते, पोहवा विलास निमगडे/2188, पोलीस अमलदार सचिन खामनकर/805, शैलेश मडावी/164, सचिन साठे/2565, विनायक सरकुंडे/2630, विशाल वाडई/2765 यांनी पार .