मोठेगाव येथे तान्ह्यापोळा उत्साह साजरा
ग्रामीण प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी
चिमूर तालुक्यातील मोठेगाव येथे शेतकरी बांधवांचा पोळा सना निमित्त तान्ह्या पोळाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण गावातील शेतकरी बांधवांनी मोठ्या उत्साहाने पोळा तसेच तान्ह्या पोळा हा सण साजरा केला. तान्ह्या पोळा हा लहान बालकांना आठवणीत राहावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे राष्ट्रपाल गेडाम(पंचायत समिती सर्कल प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) आणि दीपक दुधे (तालुका उपप्रमुख तथा जिल्हा परिषद सर्कल प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) दयांनी प्रयत्न केले. उचित बक्षीस व भेटवस्तू देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले यावेळी समस्त गावकरी तानापोळ्यात हजर होते व मोठ्या उत्साहाने तान्ह्या पोळा साजरा करण्यात आला . तान्ह्या पोळात राष्ट्रपाल गेडाम, रती दुधे, कमलेश भोयर, प्रवीण खोब्रागडे, अविनाश शेंडे ,प्रदीप गेडाम, आम्रपाली गेडाम, जगनी गेडाम, हेमलता दुधे, सारिका गेडाम, प्रकाश खोब्रागडे यांनी लहान बालगोपालांना भेटवस्तू देऊन त्यांचा आनंद द्विगुणित केला.