लोक कल्याण शिक्षण मंडळ नेरी चे दिवंगत पदाधिकारी यांना भावपूर्ण श्रद्धांजली
![](https://apnews.co.in/wp-content/uploads/2021/08/IMG-20210821-WA0040.jpg)
ग्रामीण प्रतिनिधी : पुरुषोत्तम वाळके चिमुर
नेरी येथील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था लोक कल्याण शिक्षण मंडळ नेरीचे संस्थापक सचिव स्व. दिनकरराव के. बीरेवार व माजी सचिव स्व. हाजी आसिमजी अ. अजानी यांना लोक कल्याण शिक्षण मंडळ नेरी, जनता विद्याभारती कॉन्व्हेंट,जनता प्राथमिक विद्यालय, जनता विद्यालय तथा क. महाविद्यालय नेरी यांचे तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या प्रसंगी मा. संजयभाऊ डोंगरे (सचिव, इंदिरा ज्ञान प्रसारक मंडळ नेरी), मा. विष्णुकांतजी दिनकरराव बीरेवार (अध्यक्ष, लोक कल्याण शिक्षण मंडळ नेरी), मा. टिकारामजी लक्ष्मणराव पिसे (उपाध्यक्ष, लोक कल्याण शिक्षण मंडळ नेरी), मा. सुरेशराव दागोजी पिसे (संचालक, लोक कल्याण शिक्षण मंडळ नेरी) मा. मनोहरराव नागोराव पिसे (संचालक, लोक कल्याण शिक्षण मंडळ नेरी), मा. एस. एन. येरने (मुख्याध्यापक जनता विद्या. नेरी) सौ. पी. सी. कामडी( मुख्याध्यापिका, जनता प्रा. वि. नेरी) ,सर्वशिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तथा विद्यार्थी उपस्थित होते.
नेरी व परिसरातील विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्याचा हेतू ठेवून लोक कल्याण शिक्षण मंडळाच्या संस्थापकांनी शैक्षणिक संस्था निर्माण केली त्यात स्व. दिनकरराव बीरेवार यांचा मोलाचा वाटा होता. संपूर्ण आयुष्य त्यांनी या संस्थेसाठी मेहनत घेतली. त्याच बरोबर सामाजिक, धार्मिक,राजकीय कार्यात ते नेरीतील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व होते.
स्व. आसिमजी अजानी यांनी आपले मोलाचे योगदान या शैक्षणिक संस्थेला दिले असून अनेक वर्षे सचिव पदावर ते कार्यरत होते. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना व्यवसायिक मार्गदर्शन मिळावे असे त्यांचे मत होते.