वरोरा येथील भीषण अपघातात दोन्ही वाहनाचे चालक ठार तर 15पैकी 8 जण गंभीर जखमी

जिल्हा प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
वरोरा-चंद्रपूर -नागपूर महामार्गावर एका खाजगी बसने दुभाजक ओलांडून चंद्रपूर बाजूने येणाऱ्या ट्रकला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की दोन्ही वाहनाचा समोरील केबिन चा भाग एकमेकावर आदळला. यामध्ये दोन्ही चालकाचा जागीच मृत्यू झाला असून 15पैकी8 जण गंभीर जखमी असल्याची बातमी असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. गंभीर जखमींना उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे दाखल केले असून गंभीर जखमींना चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात स्थलांतरित ( रेफर) केले आहे. ही घटना आज सायंकाळी साडेपाच वाजता घडली.
नागपूर येथून हर्ष खाजगी ट्रॅव्हल्स क्रमांक एम एच 40 एटी481 ही गाडी आज दुपारी सुमारे 40 प्रवाशांसह नागपूर हुन चंद्रपूर कडे निघाली. प्रवाशांने बस चालक साबीर शेख (वय 45 राहणार चंद्रपूर) यांना बसू सावकाश चालवण्याची विनंती केली. असे असतानाही चालक भरधाव वेगाने गाडी चालवत होता. वरोरा येथील रत्नमाला चौकापासून अवघ्या 300 मीटरवर बस येताच चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने अनियंत्रित बस महामार्गावरील दुभाजक ओलांडत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक क्रमांक एम एच 40 बीजी 95 40 वर आदळली. ही धडक इतकी जोरदार होती की बस आणि ट्रकचा समोरचा भाग केबिन मध्ये जाऊन आदळला यामध्ये दोन्ही चालकाचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातामुळे तब्बल दोन तास महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. गंभीर जखमी प्रवाशांना चंद्रपूरला हलविण्यात आले.