ताज्या घडामोडी

शासनाचा उपक्रम -बल्लारपूर महसूल प्रशासनाचा पुढाकार

आदिवासी बांधवांना विविध प्रमाणपत्रांचे वितरण !

प्रतिनिधी:रामचंद्र कामडी

आदिवासी समाजातील बहुतांशी लोकांकडे आज पावेतो रेशन कार्ड ,आधार कार्ड या शिवाय उत्पन्नाचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, अधिवास व रहिवास प्रमाणपत्र, ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र, 30 टक्के महिला आरक्षण प्रमाणपत्र शेतीचे व वनहक्काचे पट्टे नव्हते तदवतचं याच आदिवासी बांधवांजवळ मतदान ओळखपत्र नाही .त्यांना संगायो, इंगायो, श्रावणबाळ योजना व अर्थ कुटूंब योजनेचा लाभ अद्याप मिळाला नाही .त्यांना या बाबतीत अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते . एक नाही तर अनेक अडचणी त्यांचे समोर उभ्या झाल्या होत्या. हे सत्य नाकारता येत नाही . शासनस्तरावर त्यांचे समस्यांची व अडचणीची दखल घेत त्यांचे समस्यांचे निराकारण करण्याबाबतचे पत्र प्रकल्प अधिकारी आदिवासी विभाग, चंद्रपूर यांनी उपविभागीय अधिकारी,बल्लारपूर व तहसीलदार,बल्लारपूर यांना दिले. त्या अनुषंगाने एका शिबिराचे आयोजन करून त्यांचे समस्यांचे निराकरण करण्याबाबतच निर्देश ही दिले होते.

आदिवासी समाजातील लोकांना बरेचदा त्यांच्यासाठी असणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती मिळत नाही . त्यामुळे त्यांच्या पर्यंत ह्या संपूर्ण योजना पोहचत नाहीत .इतकेच नाही तर आदिवासी लोक ही शासकीय कार्यालयां पर्यंत पोहचत नाहीत.ही वस्तुस्थिती आहे. शासनाच्या अनेक योजना या जिल्ह्यात आणि तालुकास्तरावरुन राबविल्या जातात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी गोरगरीब जनतेला जिल्हा किंवा तालुकास्तरावर यावे लागते. गावापासून दूर दऱ्या खोऱ्यात राहणा-या अश्या आदिवासी समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा ध्यास बल्लारपूर तालुका प्रशासनाने घेतला आहे. त्याच अनुषंगाने त्यांच्यासाठी असणाऱ्या योजनांची माहिती आदिवासी समाजाला मिळावी या मुख्य हेतूने बल्हारपूर तालुक्यातील मनोरा येथे बल्हारपूर महसूल प्रशासन तर्फे दि. 12 नोव्हेंबर 2022 ला सकाळी 11.00वाजता विविध प्रमाणपत्र वाटपाबाबत एका शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते . सदरहु शिबिराला प्रमुख अतिथी म्हणून बल्लारपूरच्या तहसीलदार श्रीमती कांचन जगताप या प्रामुख्याने उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मानोराच्या सरपंच श्रीमती जिवनकला ढोंगे यांनी विभूषित केले होते. त्याच बरोबर या आयोजित शिबीराला नायब तहसीलदार सतीश साळवे ., शेंडे ,निरीक्षण अधिकारी भारत तुंबडे ग्रामपंचायत सदस्य लहुजी टिकले, श्रीमती मनीषा शेटे, ऋषी पिपरी व समस्त गावकरी मंडळीची उपस्थिती होती. सदरहु शिबिरात पात्र रेशन कार्ड –22, संगायो, इंगायो, श्रावणबाळ – 4, जात प्रमाणपत्र –5 निवडणूक ओळखपत्र – 9 उत्पन्नाचे दाखले 8, इत्यादी दाखल्यांचे वितरण बल्लारपूरच्या तहसीलदार डॉ. कांचन जगताप, सरपंच जीवनकला ढोंगे ,नायब तहसीलदार सतीश साळवे‌ , शेंडे ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले. महसूल प्रशासनाने आदिवासी बांधवां करीता कार्यक्रम घेऊन काही समस्यां व प्रश्न सोडविले याचे आम्हाला मनस्वी समाधान वाटत आहे अशी प्रतिक्रिया सरपंच श्रीमती जिवनकला टोंगे यांनी या शिबीरा दरम्यान व्यक्त केली .

कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी साठी नायब तहसीलदार सतीश साळवे, शेंडे, निरीक्षण अधिकारी भारत तुंबडे,पुरवठा निरीक्षक अनु जगताप मंडळ अधिकारी शंकर खोब्रागडे, तलाठी श्रीमती कोडापे, महादेव कनाके,अजय नौकरकर, अव्वल कारकून गजानन उपरे, दिपक वडुळे महसूल सहायक सचिन पुणेकर,निकिता रामटेके,श्रीमती बारचने व गावकऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.सदरहु कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिपक वडुळे यांनी केले तर उपस्थितीतांचे आभार नायब तहसीलदार साळवे यांनी मानले .अनेकांनी या आयोजित शिबीराची मुक्त कंठाने आज प्रशंसा केली .विशेष उल्लेखनीय बाब अशी कि तहसीलदार कांचन जगताप व बल्लारपूर महसूल कर्मचा-यांनी या कार्यक्रमासाठी स्वता पुढाकार घेत हा कार्यक्रम यशस्वी केला .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close