ताज्या घडामोडी

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त आयोजित भाषण स्पर्धा!

चंद्रपूरचा परब गिरटकर ठरला प्रथम क्रमांकाचा मानकरी !

प्रतिनिधी:रामचंद्र कामडी

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने काल शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.येथील दाताळा मार्गावर असलेल्या माऊंट लिटेरा झी स्कुल तर्फे आयोजित केलेल्या एका भाषण स्पर्धेत चंद्रपूर येथील विठ्ठल मंदिर वार्ड स्थित परब गिरटकर या दहाव्या वर्गात शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांने या स्पर्धेत भाग घेतला होता.

◽◼️परबने तीन मिनिटात आपलं प्रभावी भाषण करत स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला.तो माऊंट लिटेरा स्कूलचा नियमीत विद्यार्थी असून चंद्रपूरातील संस्कार नागरीक पत संस्थेच्या संचालिका ज्योति घाटे यांचा नातू आहे. पार पडलेल्या स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता.या पूर्वी
देखील परब गिरटकरने विविध स्पर्धेत भाग घेवून पुरस्कार व
सन्मान पत्रे प्राप्त केली आहे.काल सोमवार दि. १५ऑगस्टला झालेल्या एका समारंभात परब गिरटकर यांस अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.दरम्यान महाराष्ट्रातील् नामवंत सहजं सुचलं महिला व्यासपीठाच्या उपराजधानी नागपूरच्या मार्गदर्शिका माया ताई कोसरे, राजूराच्या अधिवक्ता मेघा धोटे, महिला पत्रकार सुविद्या बांबोडे , जास्मिन शेख , छबूताई वैरागडे, चंदा वैरागडे , संगिता चिताडे मनिषा गुजरकर , चंदा इटनकर मूलच्या सुपरिचित कवयित्री स्मिता बांडगे , मंथना नन्नावरे, पत्रकार शंकर चव्हाण, रामचंद्र कामडी , रामदास हेमके , नितीन लोणारे, शैलेश धात्रक, दिपक वडुळे , अमोल आखाडे , राजेन्द्र पचारे , सुनिल रामटेके , पुरुषोत्तम कोमलवार , अरुण झाडे. नितिन पाटील ,गजानन उपरे , पंकज खनके लक्ष्मि कांत बनसुरे , प्रतिभा पोहनकर, अल्का सदावर्ते, पाचवडच्या जागतिक पुरस्कार विजेती कवयित्री अर्चना सुतार, पुण्याच्या महिला पत्रकार स्नेहा मडावी, चिमूर नेरीच्या कवयित्री वर्षा शेंडे , ज्योतिताई मेहरकुरे यांचेसह अनेकांनी परब गिरटकरचे अभिनंदन केले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close