ताज्या घडामोडी

भाजपा लाखनी तर्फे तहसीलदार मार्फत मा.मुख्यमंत्री यांना निवेदन

प्रतिनिधी:नरेंद्र मेश्राम लाखनी

त्रिपुरामध्ये कोणतीही अनुचित घटना घडली नसताना जगात कोठे तरी मशिदीची नासधूस झाल्याची क्लिप व्हायरल करून महाराष्ट्रात मालेगाव, अमरावती व नांदेड येथे नुकत्याच दंगली झाल्या.पंधरा हजार ते चाळीस हजार लोकांचे जमाव रस्त्यावर उतरून दुकाने,कार्यालये,गाड्या यांचा विध्वस केला गेला.याचा भारतीय जनता पार्टी निषेध करते.जमावाने केलेल्या हिंसाचाराची उत्स्फूर्त प्रतिक्रिया म्हणून प्रामुख्या अमरावतीमध्ये लोक, रस्त्यावर उतरले.ते कोणत्याही एका पक्षाचे नव्हते व कोणी त्यांचे नेतृत्व करत नव्हते.

स्वसंरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांवरही हल्ले केले गेले.त्यानंतर पोलीस यंत्रणेकडून पक्षपाती पद्धतीने कारवाई केली जात आहे.अफवा पसरवून दंगल करणाऱ्यांना पाठीशी घालून स्वसंरक्षणासाठी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरलेल्या सामान्य लोकांना मात्र पोलिसांकडून लक्ष्य केले जात आहे.त्यामुळे त्रिपुरा येथे न घडलेल्या घटनेच्या आधारे मालेगाव,अमरावती व नांदेड येथे अफवा पसरवून व धार्मिक भावना भडकवून दंगल घडविण्याच्या प्रकाराची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत न्यायमूर्तीच्या मार्फत झाली पाहिजे.ही दंगल घडविणाऱ्या सूत्रधारांना व त्यांच्या समर्थकांना अटक केली पाहिजे दंगलीत हात असलेल्या रझा अकादमीवर बंदी घातली पाहिजे स्वसंरक्षणासाठी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांवरील कारवाई बंद करावी तसेच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकत्यावरील पूर्वग्रहदूषित कारवाई थांबवावी आणि त्यांच्याविरोधात दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत.अश्या विविध मागण्या करिता आज दिनांक 22 नोव्हेंबर 2021 ला भारतीय जनता पार्टी लाखनी तर्फे लाखनी तहसीलदार यांच्या मार्फत मा.मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले यावेळी तालुकाध्यक्ष श्री.धनंजय घाटबांधे,भाजपा उपाध्यक्ष बोळणे,उमेश गायधनी,श्री.बाळा शिवणकर,राजेश बांते,कोमल गभने,श्री.सत्यवान वंजारी,घनश्याम खेडीकर,श्री.शरद निर्वाण आदीं कार्यकर्ते उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close