परमपूज्य श्रीसाईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी येथे श्रीरामनवमी उत्सवास प्रारंभ
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी येथील परमपूज्य श्रीसाईबाबा जन्मस्थान मंदिरात श्री साई स्मारक समिती पाथरीच्या वतीने आज शनिवार दि.09 एप्रिल 2022 रोजी श्रीराम नवमी उत्सवास प्रारंभ झाला असल्याची माहिती समितीचे श्री प्रताप आम्ले यांनी दिली.
या महोत्सवा विषयी बोलताना आम्ले म्हणाले की, चैत्रशुद्ध नवमी श्रीप्रभूरामचंद्राचा जन्मदिवस श्रीरामनवमी म्हणून संपूर्ण देशभरात साजरी केली जाते. त्याच प्रमाणे परमपूज्य श्रीसाईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी येथे गेल्या 22 वर्षांपासून हा उत्सव मोठ्या श्रद्धेने साजरा करण्याची परंपरा श्रीसाई स्मारक समितीने जोपासली आहे. यावर्षी कोरणा संदर्भातील नियम व अटींचे पालन करून श्रीरामनवमी उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असून
आज प्रारंभ दिनी पहाटे 5:15 वाजता श्री साईबाबांची काकड आरती, सकाळी 6:20 वाजता श्रींचे मंगल स्नान व दर्शन, सकाळी सात वाजता शिर्डी माझे पंढरपूर आरती व त्यानंतर अमेरिकेचे निस्सीम साईभक्त श्री शिवप्रसाद कटरापट्टी व सौ पुष्पा कटरापट्टी तसेच हैदराबाद येथील परम साईभक्त एल पी रेड्डी व सौ नरसिम्हा रेड्डी यांचे शुभहस्ते श्रींची पाद्यपूजा संपन्न झाली, सकाळी आठ वाजता समितीचे कोषाध्यक्ष विश्वस्त श्री सूर्यभान सांगडे यांचे शुभहस्ते अभिषेक संपन्न झाला. पाद्यपूजा अभिषेकाचे पौरोहित्य वेदशास्त्रसंपन्न उमेश गुरू जोशी सावरगावकर यांनी केले व विष्णुसहस्त्रनाम स्तोत्राचे सामुदायिक पठण झाले, दुपारी साडेबारा वाजता माध्यान्ह आरती व महाप्रसाद झाला, त्यानंतर
श्री साईबाबांच्या जन्मस्थानाचा प्रचार आणि प्रसाराचे महान कार्य त्यांचा चैनल वरून केल्यामुळे रयत सेवा यूट्यूब चैनलचे श्री अहमद अन्सारी सर यांचा सर्व विश्वस्तांचा वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. दुपारी साडेतीन ते सायंकाळी साडेपाच या वेळेत श्री ह भ प सौ अनुराधा रवींद्र पिंगळीकर औरंगाबाद यांचे सुश्राव्य किर्तन संपन्न झाले, सायंकाळी सहा वाजता श्रींची पाद्यपूजा, सायंकाळी साडेसहा वाजता धुपारती नंतर पालखी मिरवणूक व हरिपाठ, सायंकाळी साडेसात ते रात्री साडेआठ या वेळेत निमंत्रित कलाकारांचा कार्यक्रम होईल, रात्री नऊ वाजता शेजारती होईल व नंतर मंदिर बंद होईल.
कार्यक्रमाच्या मुख्य दिवशी रविवार दिनांक 10 एप्रिल 2022 सकाळी नऊ वाजता धूनी पूजा, सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत सौ अनुराधा रवींद्र पिंगळीकर औरंगाबाद यांची श्रीराम जन्म विशेष कीर्तन सेवा होईल, दुपारी सव्वा बारा वाजता अॅड.श्री.मुकुंदराव चौधरी यांचे शुभहस्ते गव्हाच्या पोत्याचे पूजन होईल व त्यानंतर श्री सूर्यभान तुळशीराम सांगडे यांचे शुभहस्ते त्यांचे निशाणाचे पूजन व निशाण मंदिराचे शिखरावर उभारले जाईल, सायंकाळी पाच वाजता श्रींच्या रथाची भव्य मिरवणूक निघेल. तसेच सांगता दिवशी सोमवार दिनांक 11 एप्रिल 2022 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत सौ अनुराधा रवींद्र पिंपळीकर औरंगाबाद यांची गोपाळकाल्याच्या कीर्तनाची सेवा होईल व त्यानंतर दहीहंडीचा कार्यक्रम होईल. अशी माहिती श्रीसाई स्मारक समितीचे प्रताप आम्ले चौधरी यांनी दिली.