ताज्या घडामोडी

ग्रामीण रुग्णालय पाथरी यांना कायाकल्प असेसमेंट योजनेद्वारे एक लाख रुपयांचे बक्षीस

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी पाथरी परभणी

दि. 10/12/2022 रोजी कायाकल्प मूल्यांकन विभागीय टीम, औरंगाबाद, यांनी ग्रामीण रुग्णालय, पाथरी येथे भेट दिली रुग्णालयाची पाहणी केली या अगोदर सुद्धा जिल्हा स्तरावरील मा. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कायाकल्प असेसमेंट टीम ने भेट देऊन पहाणी केली तसेच त्यांच्या सोबत निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्याण कदम सर यांचे मार्गदर्शन मिळाले होते त्यानी सुद्धा रुग्णालयीन कामा बाबत समाधान व्यक्त केले आहे. विभागीय कायाकल्प टीम ने बाह्यरुग विभागा मध्ये देण्यात येणाऱ्या सेवा सुविधाची पाहणी केली तसेच अंतरुग्ण विभाग, प्रसूतीगृह यांची पहाणी करून रुग्णांशी संवाद साधला व सोयी सुविधा बाबत विचारणा करण्यात आली असता समाधानकारक उत्तरे मिळाली, रुग्णालया अंर्गत मिळणाऱ्या सेवा मध्ये (RBSK) शालेय आरोग्य विभाग यांचे मार्फत 5 मुलांवर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया करण्यात आल्या, 35 मुलांवर टंग टाय ची शत्रक्रिया करण्यात आल्या, नेत्र विभागा मार्फत मोती बिंदू, काच बिंदू तपासणी केली जाते, लसीकरण विभागा मार्फत 0 ते 5 वयोगटातील बालकांना सर्व प्रकारचे लसीकरण राबवले जाते, प्रयोगशाळा विभागामध्ये रक्त, लघवी, मलेरिया, डेंग्यू, क्षय रोग ई. ची तपासणी केली जाते, एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्रा मार्फत मोफत सल्ला व एच आय व्ही, तपासणी, व्ही डी आर एल (गुप्त रोग) तपासणी येते व कुष्ठरोग विभाग अंतर्गत रुग्णांना सर्व प्रकारच्या सेवा व सुविधा देण्यात येतात रुग्णालयामध्ये नवीन सेवा मध्ये ECG (इ सी जी) व दंत रोग विभाग कार्यरत झाला आहे व काही दिवसातच X-rey विभाग रुग्णांच्या सेवेत सुरु होत आहे, रुग्णालयात आद्यवत असा ऑक्सीजणप्लांट उभा केला आहे, वरील मजल्यावर इमारतीचे बांधकाम सुरू आहे ते पण काही दिवसात पूर्ण होईल व रुग्णांच्या सेवेत वरील इमारत सुरु होईल या सर्व बाबीची पाहणी करून रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुमंत वाघ यांचे अभिनंदन केले सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना कामा बाबत शाबासकीची थाप देऊन सर्वांचे अभिनंदन केले. व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुमंत वाघ यांनी मिळालेली बक्षिसाची रक्कम रुग्णाच्या सेवेसाठी कामत आणु असा वैद्यकीय अधीक्षक यांचा मानस आहे.
ग्रामीण रुग्णालयाला मिळालेल्या 1 लाखाचे रुपयांचे बक्षीस बाबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री. माननीय अनिल भाऊ नखाते व तहसीलदार श्रीमती सुमन मोरे मॅडम यांनी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुमंत वाघ यांचे अभिनंदन केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close