खेर्डा महादेव येथे आगळ्यावेगळ्या पद्धतीने शिवजन्मोत्सव साजरा
खेर्डा महादेव येथे आगळ्यावेगळ्या पद्धतीने शिवजन्मोत्सव साजरा
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
खेर्डा महादेव येथे प्रसिद्ध भारुडकार श्री ह भ प त्रिंबक महाराज आमले यांनी आयोजित केलेल्या जगद्गुरु तुकाराम महाराज गुरु अनुग्रह दिनानिमित्तच्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. अशी माहिती शिवकृपा मंडप डेकोरेशनचे मालक केशव सीताफळे यांनी दिली. कार्यक्रमाविषयी बोलताना केशव सिताफळे म्हणाले की, खेर्डा येथे दरवर्षी शिवजन्मोत्सव साजरा केला जातो. माघ शुद्ध दशमी हा जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा गुरु अनुग्रह दिन असून त्यानिमित्त गावातील प्रसिद्ध भारुडकार श्री हभप त्रिंबक महाराज आमले हे दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करीत असतात. यावर्षी या सप्ताहाचा मुख्य दिवस आणि शिवजन्मोत्सवाची तारीख एकाच दिवशी आल्याने गावातील तरुणांनी हा शिवजन्मोत्सव या सप्ताहामध्ये साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानिमित्त शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने श्री ह भ प योगेश महाराज गायके पोलीस अधअधिकारी तीर्थपुरी पोलीस स्टेशन यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. दिनांक 19 फेब्रुवारी रोजी गावातील ज्येष्ठ नागरिक श्री विजयकुमार सिताफळे यांचे मार्गदर्शनात वारकरी शिव दिंडी काढण्यात आली. या शिव दिंडीचे नियोजन गावातील भजनी मंडळी श्री उत्तम महाराज चोथे, श्री बळीराम महाराज शिंदे, श्री गणेश महाराज सिताफळे, श्री मधुकर महाराज आमले, श्री लक्ष्मण महाराज सिताफळे, श्री बाळासाहेब सीताफळे, श्री बाळू महाराज आमले, श्री कृष्णा महाराज सातपुते , श्री शरद महाराज आमले व गावातील सर्व भजनी मंडळी यांनी केले. गावात जागोजागी महिलांनी शिवप्रतिमेचे पूजन करून औक्षण केले. ही दिंडी पूर्ण गावभर मिरवणूक झाल्यानंतर हनुमान मंदिरासमोर कार्यक्रम स्थळी श्री त्रिंबक महाराज आमले यांच्या शुभहस्ते अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे पूजन करून महाआरती करण्यात आली. या शिव दिंडीमध्ये गावातील मुस्लिम मावळ्यांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. गावातील मौलाना श्री गुलाबखॉ पठाण साहेब यांनी या शिव दिंडीतील वारकऱ्यांच्या दुपारच्या भोजनाची व्यवस्था केली. दुपारी एक ते पाच या वेळेत श्री ह भ प बबन देव महाराज केदारे गुरुजी यांचे मंगल वाणीतून सप्ताहातील भागवत कथा संपन्न झाल्यानंतर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने श्री सुरेश आमले यांचे शुभ हस्ते सपत्नीक महाआरती झाली. तसेच शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष श्री धनंजय आमले यांनी संकल्प सोडून सर्व गावकऱ्यांना शिव भोजनाचा महाप्रसाद केला. रात्री नऊ ते अकरा या वेळेत श्री ह भ प योगेश महाराज गायके यांचे शिव कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर महाराजांचे चिरंजीव शाहीर श्रीधर गायके यांनी अफजलखानाच्या वधाचा शिव पोवाडा गायला तसेच सर्व ग्रामस्थांच्या हस्ते सामूहिक महारती झाली. त्यानंतर समितीचे सचिव श्री प्रताप आमले यांनी आभार प्रदर्शन केले आणि शिवजन्मोस्तवाचा कार्यक्रम समाप्त झाल्याचे जाहीर केले. अशी माहिती श्री केशव सीताफळे यांनी दिली.