ताज्या घडामोडी

जमात-ए-इस्लामी हिंद पाथरी कडून शाळा सुरू करण्यासाठी एसडीएम व तहसीलदार यांना निवेदन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

जमात-ए-इस्लामी हिंद पाथरी जिल्हा परभणीच्या वतीने एसडीएम पाथरी व तहसीलदार पाथरी यांना शाळा सुरू करण्यासाठी निवेदन देण्यात आले.
20 जानेवारी 2022 रोजी एसडीएम पाथरी व तहसीलदार पाथरी यांनी जमात-ए-इस्लामीच्या ‘शिक्षण विभागा’ कडून विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन सर्व खबरदारीच्या उपाययोजना करून शाळांमधील शिक्षण पूर्ववत सुरू करण्याबाबत निवेदन देण्यात आले.
शिष्टमंडळाच्या स्वरूपात निवेदन देण्यात आले त्यात आदिल अहमद हाश्मी सचिव शिक्षण विभाग जमात-ए-इस्लामी हिंद युनिट पाथरी, सिबगतुल्ला खान सर नॅशनल उर्दू शिक्षक संघ शाखा परभणी, इक्बाल अन्सारी अध्यक्ष आइटा AIITA पाथरी, उपाध्यक्ष खालिद फारुकी, युथ विंग अध्यक्ष शेख मुजम्मील, एसआयओ सदस्य शेख मुनव्वर आदी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close