रमेश पाटील व आशा दिघोरे कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदतीची मागणी

सम्यक विध्यार्थी आंदोलनाकडून वनविभाग कार्यालय भिसी यांना निवेदन
तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे
25 फेब्रुवारी ला सायंकाळी 7 वाजता जंगली डुकराच्या धडकीमुळे रमेश भिवाजी पाटील मु गडपीपरी यांचा जागीच मृत्यु झाला व आशा दिघोरे मु येरखेडा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला
यासंदर्भात रमेश पाटील व आशा दिघोरे या दोन्ही कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत द्या अशी मागणी आंबोली ग्राम पंचायत चे सदस्य व सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे चिमुर तालुका अध्यक्ष शुभम मंडपे यांनी केली
वनविभाग कार्यालय भिसी येथे सम्यक विध्यार्थी आंदोलन शाखा चिमुर च्या वतीने निवेदन देण्यात आले व तात्काळ मदत द्या अशी मागणी करून आंदोलनाचा इशारा ही देण्यात आला व वनविभागाने जंगली प्राण्यांचा व जंगली डुकरांचा योग्य ती विल्हेवाट लावावी अशी मागणी करण्यात आली व भिसी – शंकरपुर मार्गाने जंगली प्राण्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहेत तरी योग्य ती उपाययोजना करण्यात यावी
रमेश पाटील यांच्या जाण्याने त्यांच्या कुंटुंबियांवर आभाळ कोसळले आहे त्यांच्या समोर जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यांच्या मागे त्यांची पत्नी व मुलगी असा आप्त परिवार आहे व आशा दिगोरे यांचाही कुंटुंबावर खूप मोठे संकट कोसळले आहे
यावेळी निवेदन देतांना आंबोली ग्राम पंचायतचे सदस्य व सम्यक विध्यार्थी आंदोलनाचे चिमुर तालुका अध्यक्ष शुभम मंडपे व सामाजिक कार्यकर्ते मनोज सरदार , मधुकर नागपुरे दिनेश भषारकर ,तलाशकुमार खोब्रागडे , राजकुमार पाटील , सुरेश गरमळे , प्रकाश मेश्राम माजी सरपंच खापरी संगर्षं मेश्राम जेस्ट पत्रकार राजेंद्र जाधव , कुशाब डोये ,बंडू दिघोरे ,सुनील भीमटे ,संगर्षं पाटील , पंकज पोपटे , रामराव मेश्राम , आदी उपस्तीत होते