ताज्या घडामोडी

ग्रामीण रुग्णालय देवरी ईमारत वास्तुचा लोकार्पण सोहळा संपन्न

आरोग्य हिच खरी संपत्ती आहे खासदार अशोक नेते यांचे प्रतिपादन .

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी

ग्रामीण भागातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्याच्या सेवा सुविधा उपलब्ध व्हावे यासाठी आज ग्रामीण रूग्णालय देवरी येथे सुसज्य आरोग्य इमारतीचा लोकार्पण सोहळा पार पडला.आयुष्यमान भारत योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून रुग्णांना पाच लाखांची मदत मिळते.केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य योजनांची माहिती होण्याकरिता आरोग्य विभागाने नागरिकांना जागृत करत वेगवेगळ्या ठिकाणी नागरिकांच्या आरोग्याचे कॅम्प आयोजित करावे,ग्रामीण भागातील नागरिकांना शंभर टक्के आरोग्य सुविधा मिळतील याकडे सर्व आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचारी यांनी लक्ष द्यावे. नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावे,आपले आरोग्य जपणे,आरोग्याची तपासणी करणे महत्त्वाचे असते. आपले आरोग्य हीच खरी आपली संपत्ती आहे.या ग्रामिण रुग्णालयाचा जनतेला चांगला लाभ होईल. यात तिळमात्र शंका नाही. असे प्रतिपादन खासदार अशोकजी नेते यांनी अध्यक्षीय स्थानावरून बोलतांना केले.

पुढे बोलतांना खासदार महोदयांनी ४० खाटांचे ग्रामीण रूग्णालय नवीन इमारत ७ कोटी ६७ लक्ष खर्चाची इमारत उभारण्यात आली. देवरी तालुक्यातील परिसरातील गावांना याचा लाभ होणार आहे.ग्रामिण रुग्णालय राष्ट्रीय महामार्गावर असल्याने अपघातग्रस्तांना तात्काळ वैद्यकीय मदत मिळणार आहे.असे या प्रसंगी वक्तव्य केल.

ग्रामिण रूग्णालय देवरी येथील इमारतीचा लोकार्पण सोहळा आज दिनांक २६/१०/२०२३ रोजी दुपारी १.३० वाजता पाआत्राम
.
यावेळी मंचावर प्रामुख्याने मा. ना. श्री. धर्मरावबाबा आत्राम(मंत्री, अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, गोंदिया जिल्हा)माजी आमदार संजय पुराम, मा.श्री. चिन्मय गोतमारे जिल्हाधिकारी गोंदिया,मा. श्री अनिल पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी, अमरिश मोहबे जिल्हा शल्य चिकित्सक, सविता पुराम सभापती महिला व बालकल्याण समिती, जि.प. गोंदिया, पुजा सेठ (धुर्व)सभापती समाज कल्याण जि.प. गोंदिया, खंडाईत साहेब उपविभागीय अधिकारी, संजय उईके न.प. नगराध्यक्ष देवरी,प्रज्ञा संगीडवार उपाध्यक्ष न.प. देवरी,अंबिका बंजार सभापती पं.स.,अनिल बिसेन उपसभापती, कल्पना वालोदे जि.प.सदस्या, अनिल येरणे भाजपा जिल्हा महामंत्री, प्रविण दहिकर भाजपा तालुकाध्यक्ष,रमेश ताराम माजी सभापती कृ.उ.बा.स.,प्रभाकर दानोडे ओबीसी जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस,सि.के बिसेन राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता,तसेच डॉक्टर,नर्स ,आरोग्य कर्मचारी, नागरिक बंधू आणि भगिनीं मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close