शिवापूर बंदर येथे महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती उत्साहात
तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर
दिनांक.२०/१०/२०२१ श्री महर्षी वाल्मिकी ऋषी यांची जयंती दर वर्षी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असते त्याच निमित्ताने सकाळी ०५:०० वाजता गाव स्वच्छता अभियान सकाळी ०७:०० वाजता महर्षी वाल्मिकी ऋषी यांची पाठपुजा व प्रार्थना सकाळी ०८:०० वाल्मिकी ऋषी यांची भजन दिंडी मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये सहभाग क्रमांक.(१) शारदा माता भजन मंडळ शिवापूर बंदर (२) वाल्मिकी भजन मंडळ शिवापूर बंदर (३) गुरुदेव भजन मंडळ बरडघाट (४) वाल्मिक बाळकन्या मंडळ खंडाळा (५) खडसंगी येथील भजन मंडळाची सुद्धा प्रमुख उपस्थिती होती. हार्मोनियम वादक बाळू हरसुले अमरावती यांनीही या कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी कार्य केले.दुपारी १२:०० वाजता वाल्मिकी महत्त्वावर ह.भ.प.बंडुजी तराठे , ह.भ.प.ईश्वर सोनटक्के महाराज शेडेगाव यांचे मार्गदर्शन कार्यक्रम पार पडले. दुपारी ०१:०० वाजता काल्याचा किर्तन ह.भ.प.लालाजी शेंडे महाराज केसलापुर यांच्या हस्ते पार पाडण्यात आला. सायंकाळी ०५:०० वाजता महाप्रसाद मानपान कार्यक्रम लोकप्रतिनिधी तसेच सामाजिक कार्यकर्ते व ढिवर समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते यांनी यावेळी कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढविण्याचे कार्य केले. अशाप्रकारे या कर्यक्रमाची सांगता करण्यात आली.यावेळी मनोहर कामडी , विलास कामडी , मनोज कामडी , विनोद कामडी , अमोल कामडी , सुनील कामडी ,शंकर कामडी ,सूरज कामडी ,नितेश कामडी ,गणेश कामडी ,भारत कामडी ,प्रवीण कामडी ,निलेश कामडी , दादाराव कामडी ,अक्षय कोडपे ,दुर्गा कामडी , मुभीगा कामडी ,निर्मला कामडी , इंदू कामडी , किरण कामडी , मंगला कामडी , शितल कामडी संगीता कामडी तसेच आदींची उपस्थिती होती.