ताज्या घडामोडी

राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष अभिजित कुडे यांच्या प्रयत्नाने दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांच्या शेतात पोहचले विद्युत ट्रान्सफॉर्मर

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा शरद पवार यांचा सच्चा कार्यकर्ता अभिजित कुडे यांच्या कामाचा झंझावात हा खरोखरच एखाद्या परिपक्व नेत्याला लाजवेल असाचआहे , कारण ग्रामीण शेतकऱ्यांच्या समस्याचे परिपूर्ण ज्ञान असलेले अभिजित कुडे हे प्रशासनाशी ग्रामीण जनतेच्या विशेषतः शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी झगडताना त्यामुळे त्यांचा आक्रमक शैलीमुळे त्यांचे काम लवकर होतें अश्याच एका प्रश्नाला त्यानी वाचा फोडली असून मागील एक महिन्या पासून प्रलंबित प्रश्नाला त्यानी एका दिवसात सोडविले आहे.
नागरी येथील शेतकऱ्यांनी दिनांक २४ जुलै रोजी अभिजित कुडे याना फोन केला की भाउ आमचा शेतातील डी पी एक महिन्या पासून बंद आहे तर तुम्हीं महावितरण कार्यालयात येता काय . त्यानी लगेच शेतकऱ्यांची भेट घेतली त्यांची समस्या जाणून घेतली वरोरा येथे मुख्य अभियंता याना कॉल करून विचारणा केली त्या नंतर त्यांना सवलती वर बिल भरायला सांगितले व त्या नंतर तातडीने डी पी लावायला सांगितली . अधिकारांना फोन करून तात्काळ लावायला सांगितली डीपी लावायला उशीर का अस अधिकाऱ्यांना विचारले तेव्हा त्यानी ऑफिसियल कारणे सांगितले पण, अभिजित कुडे यांनी आक्रमक भूमिका घेउन मला उद्या च्या उद्या डिपी पाहिजे असे ठणकावून सांगितले आणि, काय आश्चर्य दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांच्या शेतात डीपी बसविण्यात आला त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले व त्यामुळे अभिजित कुडे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close