ताज्या घडामोडी

उखर्डा ते नागरी रस्ता तात्काळ दुरुस्त करा

अन्यथा तीव्र आंदोलन करू
सार्वजनिक बांधकाम विभागाला अभिजित कुडे यांचा निवेदनातून इशारा.

तालुका प्रतिनिधी :ग्यानीवंत गेडाम वरोरा

वरोरा तालुक्यातील उखर्डा ते नागरी हा जवळपास तीन की.मी.अंतराच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत , त्यामूळे वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा तर लागतोच परंतु,पायदळ व्यक्तींना या रस्त्यावरून चालतांना नाहक त्रास सहन करावा लागतो.या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सामाजिक कार्यकर्ता तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस वरोरा तालुका उपाध्यक्ष अभिजित कुडे यांनी आमदार व बांधकाम विभागाकडे निवेदन सादर केली परंतु, आजतागायत या रस्त्याकडे कुणीच लक्ष दिले नाही . रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची साधी तसदी प्रशासनाने दाखविली नाही .त्यामुळे उखर्डा वासियांचां जीव धोक्यात आला असून हे खड्डे बुजविण्यात यावे अशी मागणी करण्यात आली असून खड्डे न बुजविल्यास आंदोलनाचा इशारा अभिजित कुडे यांनी दिला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचेकडे उखर्डा- नागरी रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी.यासाठी निवेदन सादर केली. यापूर्वी उखर्डा येथील रस्त्यांच्या खड्ड्यावर बेशरमाची झाडे लावून आंदोलनं करण्यात आले होते . प्रशासनाने तात्पुरते मुरूम टाकून ठेवला आहे पण अजून पर्यंत तो मुरूम खड्ड्यात पडला नाही , त्या नंतर त्या खड्डात दिवे लावुन दिवाळी साजरी करून सार्वजनिक बांधकाम विभागाला साद घालण्यात आली .या खड्ड्यांमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे , खड्डात रस्ता आहे की रस्त्यात खड्डे आहेत हे देखील समजतं नाही. पावसाळा सुरू झाला आहे रस्त्यातील खड्डात पाणी साचले आहे त्यामुळे नागरिकांना खड्डाचां अंदाज समजत नाही याच रस्त्याला लागुनच उखर्डा वासी यांच्या शेत जमिनी असून,त्यांना शेतात सुद्धा याच मार्गाने जावे लागतात.रस्त्याची दयनीय अवस्था झाल्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे एक तर नव्याने या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे,अन्यथा खड्डे बुजविण्यात यावे अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा अभिजित कुडे यानी दिला आहे.
लवकरात लवकर खड्डे बुजविण्यात यावे व रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे असे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले.यावेळी रोशन भोयर, विनोद कोठारे, दीपक कुडे , हनुमान नखाते , साहिल पानतावणे, आकाश हिवरकर, तेजस उरकुडे आदी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close