साईबाबा जन्मस्थान मंदिरात तुलसी विवाह उत्साहात साजरा
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी परमपूज्य श्री साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी येथे व्यवस्थापन मंडळाच्या वतीने द्वारकामाई मंदिरात आदरणीय श्री शैलेश लाहोटी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी पाथरी व नगरपालिका प्रशासक पाथरी तसेच त्यांच्या सुविद्य पत्नी सौ ऐश्वर्या शैलेश लाहोटी यांचे शुभ हस्ते मोठ्या उत्साहात आनंदात तुलसी विवाह साजरा करण्यात आला. या प्रसंगी सौ छाया कुलकर्णी व सौ सुजाता भास्करराव डहाळे यांनी तुळशी मातेला मनोहर असा साज शृंगार केला.
या तुळशी विवाहाचे पौरोहित्य वेशासं उमेश गुरुजी जोशी, सावरगावकर यांनी केले. श्री साईबाबा जन्मस्थान पाथरीच्या व्यवस्थापन मंडळाच्या वतीने आर्किटेक्ट श्री सुभाष राजाराम दळी अध्यक्ष महोदय यांचे शुभहस्ते शैलेश लाहोटी व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.ऐश्वर्या शैलेश लाहोटी यांचा शाल श्रीफळ देऊन यथोचित आदर सत्कार करण्यात आला.
या मंगलप्रसंगी तुलसी विवाहात आदरणीय आर्किटेक्ट सुभाष राजाराम दळी अध्यक्ष साईबाबा जन्मस्थान मंदिर व्यवस्थापन मंडळ पाथरी, अॅड. अतुल दिनकरराव चौधरी मॅनेजिंग ट्रस्टी सौ प्रज्ञा अतुल चौधरी, नारायण कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी, सौ छाया कुलकर्णी साईबाबा मंदिर अधीक्षिका, पाथरी येथील प्रतिष्ठित व्यापारी महेशशेठ कासट तसेच प्रथितयश नामांकित डॉक्टर शैलेश धोंड, श्री शामराव कोंत श्री साई स्मारक समिती पाथरीचे माजी व्यवस्थापक श्री बालाजी बेदरे, सुजाता डहाळे, श्री अजय पाथरीकर साई मंदिर चे पुजारी, विष्णूपंत शिंदे वगैरे उपस्थित होते. या तुळशी विवाहासाठी नयनरम्य अशी विद्युत रोषणाई सेवा म्हणून “बाबा मंडप डेकोरेटर” शेख बाबा शेख चांद यांनी दिली.
शिर्डी येथे साईबाबा त्यांच्या संपूर्ण हयातीत द्वारकामाईतच राहत असत. साईबाबांनी त्यांच्या हयातीत शिर्डी येथील द्वारकामाई मध्ये तुलसी वृंदावन तयार केले होते. तेव्हापासून द्वारकामाई शिर्डी येथे तुलसी विवाह मोठ्या आनंदाने व उत्साहाने अत्यंत पवित्र आणि मंगलमय सोहळा साजरा होत असतो. साईबाबा स्वतः या सोहळ्यात मोठ्या आनंदाने व उत्साहाने सहभागी होत असत. अशी महत्त्वाची माहिती सौ छाया नारायण कुलकर्णी शिर्डीकर परमपूज्य साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरीच्या अधीक्षिका यांनी याप्रसंगी दिली.
परमपूज्य श्री साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी येथेही दरवर्षी तुलसी विवाह सोहळा व्यवस्थापन मंडळाच्या वतीने साजरा केला जात असतो. असेही मंदिर अधीक्षिका म्हणाल्या. अशी माहिती प्रतापराव त्र्यंबकराव आमले यांनी दिली.