ताज्या घडामोडी

ई- पीक अॅप मध्ये अनेक अडचणी

तालुका प्रतिनिधी :कु. कल्यानी मुनघाटे नागभीड

नागभीड: राज्य शासनाने सुरू केलेल्या ई- पीक योजना ज्याचा फायदा शासनाला आणि शेतकर्यांना होणार आहे. मात्र या योजनेसाठी तयार केलेल्या अॅप मध्ये अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे शेतकर्यांसह तलाठी व मंडळ अधिकार्यांचीही डोकेदुखी वाढल्याचे चित्र दिसून येत आहेत. राज्य शासनाने शेतकर्यांचा अचूक पीक पेरा काढण्यासाठी ई- पीक पाहाणी हा उपक्रम राबविताना ई- पीक पाहाणी चे दोन टप्पे निश्चित केले आहे. तसेच प्रकल्प अंमलबजावणी कालावधीही निश्चित करण्यात आला आहे. ऍपवर माहिती भरताना पेरणी योग्य प्रकार जलसीचीत असे अनेक महसुली शब्द सामान्य शेतकर्यांना माहिती नसलेल्या मुळे अनेक शेतकरी या ऍपद्वारे नोंद करण्यासाठी धावपळ करीत आहेत. तर काही शेतकरी ई- पीक पाहाणी नोंद करण्यासाठी तलाठी वर घेराव घालीत आहेत, त्यामुळे अनेक तलाठी कार्यालयात गर्दी होऊन, काही शेतकरी ईतर कामकाज साठी गेल्यास यांच्या गर्दी मुळे तलाठी कार्यालयात गोंधळ झाल्याचे दिसून येते. बर्याच शेतकर्यांना ऍप डाऊनलोड केल्यावर व पिकाची पुर्ण माहिती भरल्यावर पिकाचे फोटो काढताना जीओ टॅंग आवश्यक आहे असे मेसेज येतो. त्यामुळे पिकाचा फोटो काढण्यासाठी अडचण येते, गाव पातळीवर स्थानिक व सामुदायिक शेतकर्यांचे आपसी वादामुळे तलाठ्यांना अडचणी येत आहेत.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close