ताज्या घडामोडी

मुलभुत सुविधांसाठी रेणाखळीकरांचा विधानसभा मतदानावर बहिष्कार

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

एकीकडे आपला भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना तसेच चंद्रावर आपल्या अस्तित्वाचे निशाण उमटवत आहे तर दुसरीकडे पाथरी तालुक्यातील रेणाखळी वाशी आपल्या मूलभूत समस्या दुर करण्यासाठी झगडत असून त्यांनी आपल्याला रस्ता ,पाणी या अत्यावश्यक सेवा देण्यासाठी येणाऱ्या विधानसभा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे
पाथरी तालुक्यातील रेणाखळी


या गावची लोकसंख्या अंदाजे साडेचार ते पाच हजार असून गावात अपुरी जागा असल्याने गावातील काही कुटुंबांनी पंधरा ते वीस वर्षांपूर्वी रेनाखळी पासून अर्धा किलोमीटर दूर अंतरावर खंडोबा नगर मध्ये शेतकऱ्याकडून स्वतः प्लॉट विकत घेऊन घरे बांधली आहेत तेथे साठ ते सत्तर कुटुंब राहत असून त्यांना पाणी ,रस्ता व इतर सुविधा नसल्याने खूप अडचणींना सामोरे जावे लागते .रेणाखळी ते रत्नेश्वर रामपुरी हा रस्ता खंडोबा नगर मधुन जातो त्या त्या रस्त्याची अवस्था एकदम खराब असून शेतात जाण्यासाठी रेनाखळीचे अर्धी लोकसंख्या या रस्त्याचा वापर करते,पावसाळ्यात रस्त्यात पूर्ण चिखल होत असल्याने गुडघ्याएवढे खड्डे पडून येण्या जाण्यासाठी मोठी अडचण होते मुलांना शाळेत जाण्यासाठी तसेच आबालवृद्धांना दवाखाना बाजार किंवा शेतात खते व अवजारे नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागते यासाठी त्यांना दरवर्षी स्वखर्चातून 20ते ३० हजार रुपये लावून रस्ता दुरुस्त करावा लागतो या समस्या दूर करण्यासाठी तेथील नागरिकांनी वेळोवेळी ग्रामपंचायतकडे मागणी करूनही काही सुविधा निर्माण झाल्या नाही तसेच त्यांच्याकडे कोणताही नेता लक्ष देत नसल्याचे त्यांची तक्रार असून त्याचा निषेध म्हणून रेणाखळी येथील खंडोबा नगरच्या ६० ते ७० कुटुंबांनी आमच्या मागणीची दखल घेण्यात यावी नसता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला असून तशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी परभणी यांच्या नावे तहसीलदार पाथरी तसेच उपजिल्हाधिकारी पाथरी यांना दिले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close