प्रहार जनशक्ती पक्ष भंडारा जिल्हा च्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग शासनाच्या निषेधार्थ आंदोलन
प्रतिनिधी:गणेश पगाडे लाखनी
दिनांक 11/09/2021 ला सावर्जनिक बांधकाम विभाग व गोसेखुर्द प्रकल्पाचा बॅक वाटर साचल्यामुळे उडाण काम दिरंगाई होत असल्या मुळे भिलेवाडा ते करचखेडा/ सुर्यवाडा महामार्ग ये-जा करण्याकरिता खुप त्रास सहन करावा लागतो आहे.
आणि पावसाचे पाणी खुप येत असल्यामुळे खुप अपघात होतात. ते बघवत नसल्याने
प्रहारचे जिल्हा संघटक
अतुल राघोर्ते यांनी जिल्हा अध्यक्ष अंकुश वंजारी यांच्या सोबत फोनवर चर्चा केली. त्या चर्चे च्या माध्यमातून प्रहारच्या वतिने आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.
त्या आंदोलनाचे पत्र शासनाच्या अधिकारी व पोलीस प्रशानाला कळताच त्यांचेकडून आंदोलनाची दखल घेण्यात आली. आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करतांना
जिल्हा अध्यक्ष अंकुश वंजारी यांनी बजाऊन सांगितले की हा रस्ता सोमवार पर्यंत दुरूस्त झाला नाही तर तुम्हाला मोठ्या आंदोलनाचा सामना करावा लागेल.
त्या अनुषंगाने कारधा पोलीस स्टेशन पी.आय.साहेब व संबंधित ठेकेदार व अभियंता यांना बजाऊन सांगितले व आंदोलना ला तातपूर्ती स्तगिती देण्यात आली. त्या अनुषंगाने उपस्तीत
प्रहार जिल्हा संघटक.अतुल राघोर्ते. प्रहार जिल्हा उपाध्यक्ष धनुभाऊ हटवार, रूपेष , आर्जु मेश्राम, भुपेष सेलोकर, बंडू टांगले, महेश हजारे, शेकडो कार्यकरते व नागरिक होते.