ताज्या घडामोडी

चिरेखनी शिवारातील दारू अड्यावर पोलीसांचा छापा

एक फरार दोघाना अटक दोन लाखाच्या वरुन मुद्दे माल जप्त. पोलीसाना मोठे यश.

शहर प्रतिनिधी:संजय नागदेवे तिरोडा

तिरोडा तालुक्यातील चिरेखनी शिवारात सुरू असलेल्या अवैध दारू अड यावर तिरोडा पोलीसांनी छापा मारुन कारवाही करण्यात आली या कारवाही त पोलीसानी दोन लाख रुपयापेक्षा अधीक मुद्दे माल जप्त केला असून दोन जणांना अटक केली एक फरार झाल्याची माहिती दिली.
वॄत ॶसे की तिरोडा तालुक्यात येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती च्या निवडणुकीत शांत ता आणि सुव्यवस्था कायम रहावी. याकरिता पोलीसाची निगराणी सुरू असून. त्या संबंधाने तिरोडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार योगेश पारधी आपल्या पथकासह गस्ती वर असताना चिरेखनी या शिवारात मोह फुलाची दारू गाळण्यात असल्याची माहिती त्यांना मिळाली त्या माहितीच्या आधारे पुन्हा कर्मचारी बोलावून घटना स्थळावर छापा मारला कारवाही करण्यात आली त्या वेळी नाल्याच्या काठावर दारू गाळत असल्याचे दिसले. त्त्यांवेळी पुर्णा प्रल्हाद तांडेकर वय52 वर्षे रा. संत रविदास वार्ड तिरोडा. कुलदीप अनतराम भोयर वय 41 वर्ष रा. नेहरु वार्ड तिरोडा यांना गॅस शेगडी वर दारू गाळताना पकडले व प्रशांत नेवारे नावाचा व्यक्त ती घटना स्थळावरून पसार झाला. घटना स्थळावरून 1लाख88हजार600रुपये किमतीचा 145किलो मोहफुल सडवा . दोन हजार रुपये किमतीचा 2लोखंडी गॅस शेगडी. 9हजार किमतीचे 3 गॅस हंडे 2 रेग्युलेटर. आणि इतर साहित्य तसेच 9 हजार रुपये किमतीची मोह फुलाची दारू अशा एकूण 2लाख12हजार रुपये किमतीचा मुद्दे माल जप्त करण्यात आला.
अटक करण्यात आलेल्या च्या विरोधात दारू बंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर ची कारवाही उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार योगेश पारधी . याच्या नेतृत्वाखाली पोलीस शिपाई विदेश अंबुले .रक्षे.शेंडे . चालक प्रशांत कहालकर. अभिलाषा राऊत यांनी केली

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close