वांगेपली-गेर्रा रस्त्यांची होणार दुरुस्ती
जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या निर्देशनुसार जि.प.बांधकाम विभाग लागले कामाला.
तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी
तेलंगाना राज्यांतून गुडेम पूल्यावरून जड़ वाहन येत आहेत,त्यामुळे अहेरी जवळील वांगेपली,गेर्रा मार्गवर मोठमोठे खड्डे पडले असुन रस्ता पूर्ण पणे खराब झाला आहे.
प्राप्त माहिती नुसार गुड्डेम! वरून गिट्टि भरून जड़ वाहन मार्ग क्रम करत आहेत,मात्र सदर रस्ता हा जिल्हा परिषद अंतर्गत येत असल्याने जड़ वाहतुकीस या मार्गावरून रहदरी करण्यास प्रवेश बंदी असतो,मात्र जड़ वाहन सुरू असल्याने खड्डे पडून रस्ता खराब झाल्याने नागरिकांना त्रास सहन करवा लागत होता.सदर बाब जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती होताच सदर रस्त्याची पाहणी केली असता गावातील नागरिकांनी सांगितले कि.सदर रस्त्यावरून जड़ वाहन येत असल्याने रस्ता खराब झाले असल्याच निदर्शनास आणून दिले सर्व माहिती घेवुन जिल्हा परिषद् अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी सम्बंधित विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांना त्वरित सदर मार्ग जड़ वाहतुकीस बंद करण्याच्या निर्देश दिले होते,व सदर रस्ता जिल्हा परिषद अंतर्गत येत असल्याने जिल्हा परिषदेच निधीतून रस्ता मंजूर करून दूरस्थी करून देवू असे सांगितले व त्वरित काल जिल्हा परिषदेचे अभियंता श्री.बी.हिरे व चमूला पाठवून रस्त्यांची मोजमाप करण्यास सांगितले.
यावेळी अहेरी पंचायत समितीचे सभापती श्री.भास्कर तलांडे,जिल्हा परिषद सदस्य श्री.अजय नैताम,माजी उपसरपंच श्री.अशोक येलमूले,आविस शहर अध्यक्ष श्री.प्रशांत गोडसेलवार,व कर्मचारी उपस्थित होते.