ताज्या घडामोडी

महिला मुक्ती मोर्चा चिमूर कडून 65 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर

दिनांक 14 ऑक्टोंबर रोजी गुरुवारला धम्मचक्र प्रवर्तन दिन महिला मुक्ती मोर्चा संघटन चिमूर येथे साजरा करण्यात आला. यावेळी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पन करुन मेणबत्ती लावून प्रज्वलित करण्यात आले नंतर सर्वांनी त्यांना त्रिवार वंदन केले सर्वांना योगेश रामटेके यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे महत्त्व सांगितले अशाप्रकारे 65 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाला उपस्थित महिला मुक्ति मोर्चाचे पदाधिकारी तालुका अध्यक्ष नाजेमा पठाण, सहकार्य अध्यक्ष योगेश रामटेके,महासचिव आशिष सांगोळे,सचिव कल्पना बहादूरे, सहसचिव आकाश श्रीरामे, कोषाध्यक्ष उज्वला खोब्रागडे,सदस्य निर्मला शंभरकर, भिसी शहर कोषाध्यक्ष राजश्री राजनकर हे होते .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close