ताज्या घडामोडी

पाथरी मध्ये उपचार घेण्यासाठी गेलेल्या रुग्णांच्या नातेवाईकसह पत्रकारांना अर्वाच्च भाषेत शिविगाळ

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

पाथरी येथिल रीध्दी-सिध्दी खाजगी दवाखाना येथे मदन भालेराव हे आपल्या नातीला सलाईन निडल (सुई)हातामध्ये टाकण्यासाठी दिनांक 06/07/ 2022 जुलै रोजी डाॅक्टर प्रीतम सोमाणी यांच्या कडे जावुन उपचारबाबत विंनती केली मात्र डॉ.सोमाणी यांनी रुग्णांची सिबिसी,टेस्ट करण्याबाबत आग्रह धरुन सुई टाकण्यास नकार दीला.त्यानंतर भालेराव यांनी त्यांचे जावई पत्रकार यांना डॉक्टराना उपचार करण्यासंदर्भात सांगा म्हणुन फोन केल्यानंतर डॉ भडकले आणी काय तु पत्रकारांना फोन लावतोस का असं म्हणत मला आणी पत्रकारांना अर्वाच्च खालच्या थराला जावुन शिविगाळ केली आहे.म्हणुन मदन भालेराव यांच्या फीर्यादीवरुन पाथरी पोलीसात भादवी कलम २९४,५०४ दखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.मात्र यादरम्यान डॉ आणी रुग्णांच्या नातेवाइकांसोबत झालेल्या भांडणाचा व्हीडीओ व्हायरल झाला आहे.यासर्व प्रकाराचा आणी पत्रकराबद्दल गैर उद्गार काढणाऱ्या डॉ. प्रितम सोमणी यांचा जाहीर निषेध करत अखिल भारतीय मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी,शैलेष लाहोटी. तहसिलदार, सुमन मोरे पोलीस निरीक्षक समाधान चौव्हरे पाथरी यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close