ताज्या घडामोडी

निस्वार्थपणे समाज उपयोगी केलेल्या कार्याची पोचपावती म्हणजे विविध पुरस्कार – ब्रह्मकुमारी मीरा दिदी

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

दिनांक – 2 मार्च 2022 वार शनिवार रोजी गुडीपाडवा व मराठी नुतन वर्षाच्या साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त दिवशी , सोनपेठ वाशी यांच्या च नव्हे तर सोनपेठ तालुक्यातील प्रत्येक वयोगटातील व्यक्तींच्या लाडक्या आदरणीय ब्रह्मा कुमारी मीरा दीदी देविदास वाडकर (ब्रह्मा कुमारी संचालिका सोनपेठ नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानवता विकास संस्था तालुका महिला अध्यक्ष ) यांना अनेक वर्षापासून समाजसेवेसाठी धडपडणाऱ्या, प्रत्येक क्षेत्रात कार्य करण्याची तळमळ धडाडी चे कार्य व covid-19 च्या काळातील धाडसी कार्याची उदा – गरीब गरजू साठी धान्य किट वाटप ,पत्रकार बंधू साठी मास्क सॅनिटायझर वाटप, नगरपरिषद सफाई कर्मचाऱ्यांसाठी साबण सैनी टायझर मास्क वाटप , तसेच विधवा महिला साठी धान्य वाटप , झोपडपट्टी मजूर लोकांसाठी साबण निरमा पावडर ,टूथ ब्रश टूथपेस्ट वाटप , अशीच काही फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून जमेल तितके खारीचा वाटा उचलण्याचे कार्य मीरा दीदी यांनी पूर्ण केले . Covid-19 कालावधी म्हणजे अतिशय भीतीदायक वातावरण संपूर्ण विश्व व सर्व देश वासी यावर वाईट प्रसंग निर्माण झालेला असतानाही, जनता कर्फ्यू असल्याकारणाने एकही व्यक्ती घरा बाहेर पडता कामा नये ! अशा कालावधीतही आदरणीय मीरा दीदी यांनी धाडसी निर्णय घेऊन विविध ठिकाणी जाऊन स्वतःच्या जीवाची पर्वा न करता समाजोपयोगी कार्य केले असल्यामुळे या कर्तव्यदक्ष हिरकणी चा गौरवास्पद कार्याची नोंद घेऊन मा.जिजाऊ फाउंडेशन आयोजित शिरपूर जिल्हा वाशिम या सामाजिक संस्थेच्या वतीने , राज्यस्तरीय हिरकणी 2022 महसमेलन गुनिजन पुरस्कार दिनांक 2 जून 2022 रोजी शिरपूर जिल्हा वाशिम याठिकाणी विविध मान्यवरांच्या हस्ते दिला जाणार आहे .नेहमीच सर्व तरुणांचे प्रेरणा स्थान असणाऱ्या मीरा दीदी जी यांचे सर्व क्षेत्रामधून हार्दिक अभिनंदन केले जात आहे ,, दीदी जी असेच आपले कार्य गगन भरारी घेत राहो व आपणास विविध माध्यमातून सन्मान प्राप्त होत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ,शेवटी आपले विचार व्यक्त करत असताना मीरा दीदी यांनी सांगितले की समाज सेवेमध्ये आपल्या सर्वांच्या प्रेमाची पोचपावती म्हणून दिले जाणारे असे अनेक पुरस्कार आहेत तळागाळातील जनसामान्य पर्यंत पोहोचून ईश्र्वरी ज्ञानदानाचे कार्य जीवनभर करत राहील तसेच मागील काळात , निसर्गमित्र, समाजरत्न, इंडिया स्टार अवार्ड, वर्ल्ड गिनिज बुक रेकॉर्ड अशा विविध पुरस्कारांनी दीदी जी सन्मानित झालेल्या आहेत असेच प्रेम आपल्या सर्वांचे कायम राहो व आपल्या सर्वांच्या सहकार्याने समाजकार्य जास्तीत जास्त होत राहो हीच ईश्र्वर चरणी प्रार्थना करेन .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close