तुळजाभवानी मल्टिस्टेट शाखा पाथरी च्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रेणापूर येथे मा.दादासाहेब काका टेंगसे माजी सभापती जि.प.परभणी तथा शिवसेना नेते यांच्या हस्ते तुळजाभवानी मल्टिस्टेट शाखा पाथरी च्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्कुल बॅग चे वाटप व ग्रामपंचायत च्या 15 व्या वित्त आयोगामार्फत शाळेला क्रीडा साहित्य व अंगणवाडी येथे LED टिव्ही,पोर्टेबल साउंड सर्विस,कॉम्प्युटर साहित्य ,प्राथमिक आरोग्य केंद्र येथे वाफे ची मशीन,स्वच्छता साहित्य,सॅनिटायजर व इतर आरोग्य वापरण्याचे साहित्य भेट देण्यात आले
यावेळी माजी शिक्षण व आरोग्य सभापती दादासाहेब काका टेंगसे,बँक मॅनेजर सोळंके साहेब,विभागीय व्यवस्थापक निरपणे साहेब,युवा नेते संदीप भैया टेंगसे,सुरेश आप्पा टेंगसे,माजी उपसरपंच लक्ष्मणराव टेंगसे,सरपंच चोखोबा उजगरे,सतीश पाटील,ग्रामसेवक संदीपान घुंबरे साहेब,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष निहाजू डांगे,माणिकराव टेंगसे,मुख्याध्यापक सर्व शिक्षक,आशा ताई,अंगणवाडी ताई,आरोग्य सेविका,ग्रामपंचायत कर्मचारी व सर्व विद्यार्थी गावकरी उपस्थित होते.