आम आदमी पार्टी च्या प्रयत्नाने वीस युवकांना रोजगार
आम आदमी पार्टी च्या प्रयत्नाने वीस युवकांना रोजगार
चिमूर विधानसभेत आप च्या रोजगार शिबिरात नियुक्ती पत्रांचे वाटप.
मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे
बेरोजगारी हा तरुणांना भिडसवणारा तीव्र प्रश्न असून सध्यस्थितीत भरपूर शिक्षण घेतलेले तरुण-तरुणी रोजगारापासून वंचित आहेत. चिमूर विधानसभेत गावोगावी बेरोजगारी असून होतकरू युवक-युवती हाताला काम नसल्यामुळे हतबल आहेत. परिस्थितीची गरज ओळखून आम आदमी पार्टी तर्फे चिमूर विधानसभा संयोजक प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे यांच्या पुढाकाराने नेरी येथे ‘सौर उर्जेवर आधारित उद्योग व नौकरी’ यावर एक दिवसीय रोजगार शिबीर आयोजित केले गेले.
पवार सोलर चे संस्थापक व मुख्य संचालक श्री किशोरजी पवार यांनी रोजगार शिबिराला मार्गदर्शन केले. अनेक इच्छुक युवकांनी सौर उर्जेवर आधारित उद्योग उभारण्यास पुढाकार घेतला. या शिबिरामध्ये वीस युवकांची मुलाखत घेवून नौकरी साठी नियुक्ती केली गेली व त्यांना श्री किशोरजी पवार, प्रा. डॉ. अजय घ. पिसे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
अश्या प्रकारच्या शिबिरामध्ये वीस युवकांना जागेवर नियुक्ती पत्र देण्यात आल्यामुळे परिसरात आम आदमी पार्टी च्या या उपक्रमाची होतकरू युवक-युवतींमध्ये चांगलीच चर्चा होत असल्याचे दिसून येते. या रोजगार शिबिराला यशस्वी करण्यासाठी आपचे पदाधिकारी आदित्य पिसे, विशाल इंदोरकर, मंगेश वांढरे, योगेश सोनकुसरे, प्रमोद भोयर, नानक नाकाडे यांनी अथक परिश्रम घेतले.