जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांची मतदान केंद्रांना भेट
ज

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दि. 02/12/2025 परभणी जिल्ह्यातील 7 नगरपरिषदांच्या सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरीता मंगळवार, 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान पार पडले. दरम्यान, जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी मानवत, पाथरी येथील मतदान केंद्रांना भेट देऊन पाहणी केली.
जिल्हाधिकारी यांनी मानवत येथील आयटीआय व शकुंतलाबाई कांचनराव कत्रुवार महाविद्यालयातील मतदान केंद्रांना भेट दिली. त्यानंतर त्यांनी पाथरी येथील नेताजी सुभाष विद्यालयातील मतदान केंद्राला भेट देऊन पाहणी केली.

मतमोजणी केंद्र व स्ट्रॉंगरुमला भेट
जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी पाथरी येथील मतमोजणी केंद्र व स्टाँगरुमला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी सुरक्षा व्यवस्थेबद्दल आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकऱ्यांना केल्या. पाथरी नगर परिषद निवडणुकीसाठी नियुक्त निवडणूक निरीक्षक राजेश काटकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार आदी याप्रसंगी उपस्थित होते.









