ताज्या घडामोडी

वित्तीय साक्षरता अभियान अंतर्गत चेतना सायकल रँली आपल्या दारी

नाबार्ड पुरस्कृत महाराष्ट्र बँकेचा उपक्रम.

पाथरी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने स्वागत.

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

नाबार्ड पुरस्कृत महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीने वित्तीय साक्षरता अभियान अंतर्गत चेतना सायकल रँली आपल्या दारी हा स्तुत्य उपक्रम मराठवाडाभर राबविण्यात येत आहे.या रँलीचे २४ जुलै रोजी पाथरी येथे आगमन झाल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले या चेतना रँलीमधील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे चेअरमन मिलिंद घारड,मुख्य सरवस्थापक संजय वाघ, सरव्यवस्थापक विजय मानकर,परभणी क्षेत्रीय व्यवस्थापक जी.एस.देशमुख यांचा पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिलराव नखाते यांनी सत्कार केला.यावेळी संचालक माधवराव जोगदंड,सुभाष कोल्हे,नारायणराव आढाव,बालाजी मुजमुले,शिवाजी कुटे यांची उपस्थिती होती.
महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीने मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात काढल्या जात असलेल्या चेतना सायक रँली अभियान संदर्भात मार्गदर्शन करताना महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे चेअरमन मिलिंद घारड यांनी सांगितले की जास्तीत जास्त ग्राहकाने बँकेचे बचत खाते उघडणे, ज्यांचे बँक खाते आहेत त्यांनी वेळोवेळी बँकेसोबत व्यवहार करत जमेल तशी बचत करावी जेणेकरून अडीअडचणी च्या काळात किंवा उतरत्या वयात ती बचत आपल्या कामी पडेल, त्याच बरोबर प्रत्येकाने आपापल्या खात्यावरून स्वतःचा अपघात विमा काढून घ्यावा. त्यात वार्षिक १२ रुपये यात २ लाख संरक्षित रक्कम व वार्षिक ३३० रुपये या विम्यात पण २ लाख रुपये संरक्षित रक्कम आहे. असे दोन प्रकारचे अपघात संरक्षण विमे आहेत. या दोन्ही प्रकारच्या विम्यात दुर्दैवाने अपघात झालाच तर लाभार्थ्यांच्या वारसांना एकंदरीत चार लाख रुपयांचा लाभ घेता येतो. एवढेच नाही तर वयाच्या १८ वर्षांपासून ते ४० वर्ष वयोगटातील लोकांसाठी अटल पेन्शन योजना सुद्धा चालू असून त्यात वयाच्या प्रमाणात मासिक, सहामाही व वार्षिक हप्ता आपल्या बँक खात्यातून जमा करता येतो आणि ती पेन्शन ची रक्कम वयाच्या ६० वर्षानंतर आपल्याला मिळवता येते. अशा विविध प्रकारच्या योजना शासन आपल्यासाठी राबवत असून त्याचा आपण सर्वांनी पुरेपूर लाभ घ्यावा व उतरत्या वयातली मायापुंजी आजपासूनच जमा करण्यास सुरुवात करावी जेणेकरून वेळ गेल्यानंतर नशिबाला दोष देत बसण्यापेक्षा आजच सावध भूमिका घेऊन आपापल्या बँकेशी संपर्क साधावा आणि अशा अनेक योजनांबाबत सविस्तरपणे त्यांनी मार्गदर्शन केले.बाजार समीतीच्या वतीने उपस्थित मान्यशरांचे आभार मानले.

वित्तीय साक्षरता अभियानांतर्गत महाराष्ट्र बँकेच्या चेतना रँली चे आगमन रवीवारी पाथरी शहरात झाले.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिलवराव नखाते यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे चेअरमन मिलिंद घारड यांचा सत्कार केला याप्रसंगी मुख्य सरवस्थापक संजय वाघ, सरव्यवस्थापक विजय मानकर,परभणी क्षेत्रीय व्यवस्थापक जी.एस.देशमुख,बाजार समीती संचालक माधवराव जोगदंड,सुभाष कोल्हे,नारायणराव आढाव,बालाजी मुजमुले,शिवाजी कुटे आदी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close