दुर्गापुर मध्ये लाखोंच्या मुद्देमालासह चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात
मुख्य संपादक :कु.समिधा भैसारे
लोखंडी पाईप गॅस कटरच्या सहाय्याने कापुन चोरी केल्याची घटना चंद्रपूर मधील जुनी किटाळी रोड WCL पदमापूर परीसरात घडली.
दुर्गापूर पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवुन गती देत चौकशी करून चार आरोपीला अटक केली. अटक करण्यात आलेले आरोपी जग्गा ऊर्फ जगराखन बिंदे सिन्हा, वय 39 वर्षे रा. समतानगर,मो. आटीफ शेख मो. जानु शेख वय 42 वर्षे रा. दुर्गापूर वार्ड क्र. 3, व रेशम दर्शनसिंग सग्गु वय 28 वर्ष रा. दुर्गापूर वार्ड क्र. 3, भुपेंद्र सजनु ठाकुर वय 32 वर्षे रा. दुर्गापूर वार्ड क्र. 3 अशी आहे. या आरोपीनी 15 फुट लांब लोखंडी पाण्याचा पाईप ज्याचे अंदाजे वजन 1100, किलो व त्याची अंदाजे किंमत 66,000/- रुपये व महिंद्रा पिकअप MH-34, AB-7983 क्रमांकाची गाडी ज्याची अंदाजे किंमत 5,00000/- रुपये तसेच एका गॅस सिलेंडर किंमत 5,000/- रुपये एक गॅस कटर किंमत 4000/- रुपये
असा एकूण 5,75,000/- रुपयांचा मुद्देमाल चार आरोपींकडुन जप्त करण्यात आलेला आहे. पुढिल तपास दुर्गापुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक स्वप्निल धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली डि. बी. पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रविण सोनुने, पो.ह. वा. सुनिल गौरकार, पोशि मंगेश शेंडे, पो.शि. मनोहर जाधव पो. शि. किशोर वलके यांच्या अंतर्गत दुर्गापूर पोलीस स्टेशन करीत आहे.