राज्य राखीव पोलिस दलात महिला बटालीयनचे दोन गट स्थापन करा -पोलिस बाॅईज असोसिएशनची मागणी
प्रतिनिधी:रामचंद्र कामडी
केंद्र सरकार व इत्तर राज्य सरकारच्या धर्तीवर आपल्या पूर्विच्या महाराष्ट्र शासनाने महिला बटालियन स्थापन करण्याची घोषणा केली होती.परंतु अद्यापही SRPF मध्ये एकही महिला बटालियन स्थापन केले नाही.राज्य राखीव दलाचे कार्यक्षेत्र पाहता गणेशोत्सव, दुर्गा उत्सव, महापुरुषांची जयंती, निवडणूक बंदोबस्त व अन्य बंदोबस्तात प्रामुख्याने महिला पोलिसांची खुपच गरज भासते.त्यामुळे महिला बटालियन स्थापन झाली तर बंदोबस्ताच्या दृष्टीने अधिक सोईस्कर होईल.आणि महिलांना न्याय मिळेल कारण आता सर्वच क्षेत्रात महिला अग्रेसर होत आहेत.त्या साठी महाराष्ट्रात गट १(पुणे परिक्षेत्र) पश्चिम महाराष्ट्रात व दुसरा गट अमरावती परिक्षेत्रात कार्यान्वित करण्यात यावा कारण सध्याच्या परिस्थितीत बुलढाणा, अकोला, जळगाव, यवतमाळ,वाशिम येथील बंदोबस्त करीता नागपूर जालना,धुळे , हिंगोली, अमरावती या सर्व घटकातुन बंदोबस्त करीता SRPF पाठिंबा देते यातील जवानांना दुर तसेच अकोला जिल्ह्यातील हिवरा उदेगांव या ठिकाणी SRPF ची बटालियन स्थापन करण्यात आली होती.जागा सुध्दा अधिग्रहित केली होती.परंतू राजकीय दबावाखाली सदरचा गृप काटोल येथे स्थलांतरित करण्यात आला आहे.दरम्यान उपरोक्त मागणीचे एक लेखी निवेदन चंद्रपूर जिल्हा पोलिस बाॅईज असोसिएशनचे विदर्भध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष भुवनेश्वर पद्माकर निमगडे यांचे नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांचे मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना सादर करण्यात आले आहे.