ताज्या घडामोडी

कामगारांच्या हितासाठी पार पडला मूल नगरीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी औद्योगिक सेलचा एक भव्य कार्यक्रम

अनेक मान्यवर मंडळींची उपस्थिती

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी

विदर्भाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील मूल नगरीत काल शुक्रवार दि.१५ डिसेंबरला दुपारी १ वाजता स्थानिक डॉ.हेगडेवार सभागृहात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी औद्योगिक सेलच्या वतीने कामगारांच्या हितासाठी एक मार्गदर्शक भव्य कार्यक्रम पार पडला.तालुक्यातील शेकडों कामगार बांधव या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित झाले होते.विशेष म्हणजे आयोजित या कार्यक्रमाला महिलांची व तरुणींची उपस्थिती लक्षणीय अशीच होती.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अधिवक्ता संतोष शिंदे यांनी भुषविले होते तर या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी औद्योगिक सेलचे अध्यक्ष हेमंत सोनारे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी औद्योगिक सेलचे सचिव विजय नळे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी औद्योगिक सेलचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय समर्थ,रोहित शिंगाडे,,संजय थूल ,भुषण मोरे,प्रितम सातपुते,करण कामटे, उपस्थित होते.याच कार्यक्रमाच्या निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र बहाल करण्यात आले.सदरहु कार्यक्रमाचे प्रास्ताविक कांग्रेसचे जेष्ठ नेते बंडुभाऊ गुरनूले यांनी केले.त्यांनी आपल्या भाषणातून औद्योगिक सेलच्या कार्याची विस्तृतपणे माहिती दिली.या वेळी हेमंत सोनारे, अधिवक्ता संतोष शिंदे अधिवक्ता सातपुते,व अन्य मान्यवरांनी उपस्थितीतांना मोलाचे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाला मूल शहरातील कामगार बांधवासह तालुक्यातील कामगार बांधवांची मोठ्या संख्येंने उपस्थिती लाभली होती.या शिवाय सदरहु कार्यक्रमाला नलिनी अडेप्पवार महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं चंद्रपूरच्या तुकुम निवासी मंथना नन्नावरे,कु.स्मिता पेरके, विनोद आंबटकर, फरजाना शेख, राधिका बुक्कावार,यांची उपस्थिती लाभली होती.कार्यक्रमाचे सुरेख संचालन नलिनी अडेप्पवार यांनी केले तर उपस्थितीतांचे आभार श्यामला बेलसरे यांनी मानले.विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या निमित्ताने मूल तालुक्यातील अनेक कामगार बांधवांची नोंदणी कार्यक्रमस्थळी झाली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी औद्योगिक सेलचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय समर्थ व त्यांच्या सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.कार्यक्रमाला कामगार बांधवांची उपस्थिती लक्षणीय होती.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close