नाटक,लोककला, तमाशा व इतर सांकृतिक कार्यक्रम सुरु करण्यास परवानगी द्यावी
तालुका प्रतिनिधी : हेमंत बोरकर मुल
सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी येवून आज बरोबर एक वर्ष झाले…
वाद्यवृंद, लावणी, तमाशा, आर्केस्ट्रा, लोकनृत्य, लोककलावंत, साऊंड, लाईट, सेटिंग, बँकस्टेज आर्टिस्ट इत्यादी सर्व कलावंत आज एक वर्ष आपला उदरनिर्वाह कसा चालवत आहेत हे फक्त त्यांनाच माहित.
अनेक कलाकारांनी आत्महत्या केल्या तर काही कलाकार या विवंचनेत मृत पावले…अनेकांनी आपल्या उदरनिर्वाहाचे साधन असणारी वाद्य विकली, घरातील दागदागिने विकले…कोरोना ने मरु पण उपासमारीने नको अशा मनःस्थितीत कलाकार आला आहे…
परंतु शासनाने कलाकारांची कोणतीही दखल अजून घेतलेली नाही…आम्हाला भिक नको परंतु आमचे काम आम्हाला करु द्या…आम्ही सर्व नियम पाळून कार्यक्रम करायला तयार आहोत परंतु सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी नको…आता कलाकारांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका…. अशी मागणी मूल तालुक्यातील लोक कलावंतानी केली आहे.